शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Accident: आईच्या अंत्यदर्शनासाठी येत असलेल्या मुलावर काळाचा घाला, अपघातात जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:53 IST

मायलेकांवर पाठोपाठ अंत्यसंस्कार करताना अश्रूही थिजले

सचिन ढोलेसमडोळी : आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठवणींनी घायाळ झालेले हृदय अन् डोळ्यातून ओघळणारे अश्रू घेऊन तो अंत्यदर्शनासाठी निघाला. दुसरीकडे मुलाची प्रतीक्षा करीत कुटुंब अंत्यसंस्काराच्या तयारीत गुंतले होते. इतक्यात मुलाच्या अपघाताची वार्ता कानावर पडताच कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार अन् सारे गाव शोकसागरात बुडाले.मिरज तालुक्यातील समडोळी येथे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. मृणालिनी किरण कुदळे (वय ५५) यांचे गुरुवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान निद्रावस्थेतच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने कुदळे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले. मात्र, या वेदनांच्या जखमा ओल्या असतानाच त्याचदिवशी मृणालिनी यांचा पुत्र सौरभ किरण कुदळे (वय २७, रा. समडोळी) याचाही अपघातीमृत्यू झाला.आईच्या निधनाची बातमी कळताच सौरभ बेंगलोरहून तातडीने समडोळीकडे निघाला. अभियंता म्हणून एका कंपनीत कार्यरत असलेला हा तरुण आईच्या अंत्यदर्शनासाठी येत होता. मात्र नियतीने क्रूर खेळी खेळली. हुबळी-धारवाड मार्गावर त्याच्या दुचाकीला भीषण अपघात झाला आणि तो जागीच गतप्राण झाला. वडील किरण कुदळे आणि नातेवाइकांवर दुःखाचा असा महाआघात झाला की, अश्रूही थिजले.सौरभला अपघातानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह गावात पोहोचताच वातावरण शोकाकुल झाले. सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, गावही सुन्न झाले. शनिवारी रात्री आईवर तर शुक्रवारी सायंकाळी सौरभवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी सकाळी मायलेकांच्या अस्थी विसर्जनाचा विधी पार पडणार आहे. सौरभच्या पश्चात वडील किरण कुदळे, एक भाऊ, आजी, चुलता, चुलती असा परिवार आहे.

दोन गावे शोकसागरातकुदळे कुटुंब मूळचे दुधगाव (ता. मिरज) येथील. सध्या ते समडोळीत राहतात. त्यामुळे ही दोन्ही गावे या घटनेनंतर शोकसागरात बुडाली. दुधगाव-समडोळीच्या स्मरणात ही घटना दीर्घकाळ कोरली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: Son Dies in Accident En Route to Mother's Funeral

Web Summary : A son, traveling from Bangalore for his mother's funeral in Samdoli, tragically died in a road accident near Hubli-Dharwad. The family and village are in deep mourning after the double tragedy struck the Kudale family.