शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 22 चारा छावण्या मंजूर, 13 ठिकाणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 4:24 PM

माणसांबरोबरच दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्यक्रमाने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 22 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी 13 चारा छावण्या सुरू झालेल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये दिनांक 16 मे अखेर मोठी 4 हजार 465 व लहान 841 अशी एकूण 5 हजार 306 जनावरे आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात आतापर्यंत 22 चारा छावण्या मंजूर, 13 ठिकाणी सुरूजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली माहिती

सांगली : माणसांबरोबरच दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्यक्रमाने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 22 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी 13 चारा छावण्या सुरू झालेल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये दिनांक 16 मे अखेर मोठी 4 हजार 465 व लहान 841 अशी एकूण 5 हजार 306 जनावरे आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यात 22 मंजूर चारा छावण्यांपैकी आटपाडी तालुक्यात तडवळे, आवळाई, शेटफळे, उंबरगाव, पळसखेल, लिंगीवरे, झरे व बोंबेवाडी येथे, कवठेमहांकाळ तालुक्यात चुडेखिंडी येथे तर जत तालुक्यात लोहगाव, दरिबडची, सालेकिरी व बेवनूर येथे चारा छावण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत.जत तालुक्यात बालगाव, कुडणूर, आवंढी, अचकनहळ्ळी, वायफळ, कोसारी व बनाळी येथे, आटपाडी तालुक्यात करगणी येथे व कवठेमहांकाळ तालुक्यात अलकूड एस येथे चारा छावणी सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. चारा छावण्यातील जनावरांची संख्या दररोज वाढत आहे. आटपाडी तालुक्यातील लिंगीवरे, झरे व बोंबेवाडी येथे दिनांक 17 मे रोजी चारा छावणी सुरू करण्यात आली आहे.

चारा छावणी येथेसुरू तडवळे येथे श्री गजानन मजूर कामगार सोसायटी, आटपाडी, आवळाई येथे सिद्धनाथ महिला दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था, आवळाई, चुडेखिंडी येथे लोकनेते जयसिंग (तात्या) शेंडगे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, चुडेखिंडी, लोहगाव येथे श्री मारूतीराव पाटील सार्वजनिक वाचनालय, लोहगाव, शेटफळे येथे जोगेश्वरी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, शेटफळे, पळसखेल येथे पळसखेल विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, पळसखेल, बेवनूर येथे व्दारकाई नाना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बेवनूर, सालेकिरी पाच्छापूर येथे श्री बुवानंद दुध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित सालेकिरी पाच्छापूर, दरिबडची येथे श्री ज्योतिर्लिंग सहकारी दूध उत्पादक संस्था, मर्यादित दरिबडची, उंबरगाव येथे धुळदेव बहुउद्देशीय शिक्षण संस्था उंबरगाव, बोंबेवाडी येथे मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बोंबेवाडी, लिंगीवरे येथे गोयाबा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित लिंगीवरे आणि झरे येथे श्री गजानन मजूर कामगार सोसायटी, आटपाडी 

या संस्थांना चारा छावणी सुरू करण्यास मंजुरीहोनाप्पा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, बालगाव, श्री महालिंगराया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुडणूर, आवंढी सर्व सेवा सोसा. लि. आवंढी, कै. धैर्यशील यशवंतराव सावंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. जत, धोंडीआप्पा यादव बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक विकास संस्था वायफळ, श्री सिध्दनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. अंकले, श्री सिध्दनाथ दूध व्यवसायिक सह संस्था अंतराळ (सर्व ता. जत) सुवर्ण शिक्षण संस्था, अलकूड (एस) (ता. कवठेमहांकाळ) आणि आटपाडी तालुका ग्रामीण वि. का. स. संस्था, करगणी (ता. आटपाडी) मोठी व लहान जनावरे चारा छावणी

- तडवळे - मोठी 830, लहान 142, एकूण 972. आवळाई - मोठी 674, लहान 151, एकूण 825. चुडेखिंडी - मोठी 787, लहान 115, एकूण 902. शेटफळे - मोठी 287, लहान 60, एकूण 347. लोहगाव - मोठी 617, लहान 117, एकूण 734. दरिबडची - मोठी 376, लहान 73, एकूण 449. सालेकिरी - मोठी 285, लहान 42, एकूण 327. बेवनूर - मोठी 393, लहान 61, एकूण 454. उंबरगाव - मोठी 71, लहान 28, एकूण 99. पळसखेल - मोठी 145, लहान 52, एकूण 197.

टॅग्स :droughtदुष्काळSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी