शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

मुलं चोरणारी टोळी समजून सांगलीत साधूंना बेदम मारहाण; सहा जण अटकेत, २५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 4:23 PM

कोणतीही विचारपूस न करता गाडीत बसलेल्या साधूंना बाहेर ओढून पट्ट्याने, काठीने, चपलांनी मारहाण

मच्छिंद्र बाबरमाडग्याळ/सांगली : मोरबगी (ता. जत) येथे लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी असल्याच्या संशयावरून उत्तराखंड येथील सहा साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना काल, मंगळवारी घडली. या मारहाणीत सर्व साधू गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी लवंगा येथील सहा जणांना अटक तर, २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उत्तराखंड येथील सहा साधू मोटारीतून (क्र. यूके ०६ एएच ६१५२) प्रवास करीत विजापूरहून पंढरपूरकडे निघाले होते. मंगळवारी दुपारी मोरबगी येथे लवंगा व उमदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उमदीकडे जाणारा चालकास रस्ता लक्षात आला नाही. यामुळे त्यांनी तेथे असलेल्या एका मुलाला जवळ बोलावून रस्ता विचारला. मात्र साधूंचा पोशाख पाहून घाबरलेल्या मुलाने रस्ता सांगण्याऐवजी आरडाओरडा सुरु केली.

मुलाच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यांनी कोणतीही विचारपूस न करता गाडीत बसलेल्या साधूंना बाहेर ओढून पट्ट्याने, काठीने, चपलांनी मारहाण सुरू केली. साधूंनी विनवणी करूनही लोक शांत होत नव्हते. उमदी पोलिसांना फोनवरून माहिती देऊन 'तुम्ही लहान मुले पळवायला आलाय' असे म्हणत वाहनचालकासह सर्व साधूंना बेदम मारहाण केली. मारहाणीत सर्व साधू गंभीर जखमी झाले.उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेशपोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन मारहाण होत असलेल्या साधूंना वाचवले व उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मारहाण प्रकरणी साधूंनी तक्रार देण्यास नकार देत निघून गेले. ही घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी कोल्हापूरचे विशेष पोलिस महासंचालक यांना या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.संशय आल्यास पोलिसांना माहिती द्या - पोलीस अधीक्षकलवंगा येथील सहा जणांना उमदी पोलिसांनी अटक करून सुमारे पंचविसजणावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी परराज्यातील संशयीत व्यक्तीबाबत संशय आल्यास कायदा हातात कोणी न घेता जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

उमदी पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळलाघटनास्थळी उमदीचे पोलीस उपनिरीक्षक तात्यासाहेब खरात वेळीच फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाच्या तावडीतून साधूंना बाजुला घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रांची खातरजमा केल्याने अनर्थ टळला, अशी चर्चा होती.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी