शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, व्हेंटिलेटरचा बेड मिळेल का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

सांगली : ‘नमस्कार साहेब, कॉल सेंटर ना, पेशंटची तब्येत बिघडली आहे... ऑक्सिजनचा बेड मिळेल का?... ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला व्हेंटिलेटर ...

सांगली : ‘नमस्कार साहेब, कॉल सेंटर ना, पेशंटची तब्येत बिघडली आहे... ऑक्सिजनचा बेड मिळेल का?... ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला व्हेंटिलेटर बेडची गरज आहे, मिळेल का? यासह इतर अनेक प्रश्नांसाठी सध्या जिल्हा परिषदेतील कॉल सेंटरमधील फोन सदैव खणखणत असतो. २४ तास कार्यरत असलेल्या या सेंटरमुळे कोरोनाबाधितांना मोठा आधार मिळाला आहे. केवळ माहिती देऊन न थांबता या सेंटरमधील कर्मचारी रुग्ण दाखल होईपर्यंतचा ‘फॉलोअप’ घेत असतात.

जिल्ह्यात पंधरवड्यापर्यंत नियंत्रणात असलेली कोरोना स्थिती अधिकच चिंताजनक बनत चालली आहे. त्यामुळे रुग्णांवर योग्यवेळी उपचार होण्यासाठी प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्यावतीनेही सुविधा सुरू केली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या सोयीसाठी प्रशासनाने कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध केली आहे. जिल्हा परिषदेत असलेल्या कॉल सेंटरवर बेडची उपलब्धतेची माहिती दिली जाते. यासाठी चार कर्मचारी कार्यरत असून, ८ लाईन्सची व्यवस्था आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातही १०७७ हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. यात तक्रारींचे निवारण केले जाते. रेमडेसिविर मिळत नसल्याबाबत व लसीकरणाबाबतही तक्रारी येत असतात. याठिकाणी सध्या तीन कर्मचारी कार्यरत आहेत. दिवस रात्र पूर्णवेळ ही सुविधा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना एका कॉलवर सगळी माहिती मिळत आहे.

चौकट

जिल्हा परिषदेत कॉल सेंटर

१) जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या कॉल सेंटरवर ग्रामीण भागातून व परजिल्ह्यातूनही कॉल येतात. यात प्रामुख्याने कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सोय याबाबतही विचारणा केली जाते.

२) जिल्हा परिषदेतील कॉल सेंटरमध्ये चार कर्मचारी कार्यरत आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालयात तीन कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय महापालिकेच्यावतीने कार्यरत ठिकाणीही माहिती दिली जात आहे.

चौकट

कोणाला हवे रेमडेसिविर, तर कोणाला त्वरित उपचार

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची अचानक प्रकृती बिघडल्यास कॉल सेंटरवर लगेच कॉल येतो. कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे, याची माहिती घेऊन रुग्णाचे नातेवाईक त्याला तिथे दाखल करतात, तर गेल्या आठवड्यापर्यंत रेमडेसिविर इंजेक्शन हवे आहे. मात्र, मिळत नसल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत.

चौकट

लसीकरणापासून उपचारापर्यंतची मदत

कॉल सेंटरवर लसीकरण होत नसल्याबाबतही नागरिक तक्रारी करतात. सध्या लसींचा पुरवठा कमी असल्याने अनेकदा लसीकरण थांबवावे लागत आहे. त्यामुळे याबाबतही नागरिक सांगतात. शिवाय उपचार आणि घ्यावयाची काळजी, सध्या सुरू असलेल्या कडक निर्बंधांच्या नियमावलीसाठीही अनेकजण कॉल करत असतात.