शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन मोहीम यशस्वी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST

जिल्हा परिषदेतर्फे आयोजित सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे उद्घाटन अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी दीपप्रज्वलनाने केले. यावेळी सभापती आशा पाटील, ...

जिल्हा परिषदेतर्फे आयोजित सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे उद्घाटन अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी दीपप्रज्वलनाने केले. यावेळी सभापती आशा पाटील, विजयसिंह जाधव आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ग्रामपंचायतींनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी केले. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायतींसाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

ग्रामीण भागातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी निवडक ८९ गावांमध्ये विशेष प्रकल्प जिल्हा परिषदेतर्फे राबविला जात आहे. त्यासाठी ९० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. त्याविषयी गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवकांना कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्ष कोरे यांनी दीपप्रज्वलनाने तिचा शुभारंभ केला. त्या म्हणाल्या, प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीचा उपयोग ग्रामपंचायतस्तरावर प्रकल्प राबविण्यासाठी करावा. सांडपाण्याचे व्यवस्थापन न झाल्याने अनेक गावे विविध आरोग्य समस्यांना तोंड देत आहेत, त्याचे निराकरण या मोहिमेतून यशस्वीरीत्या करण्याचा प्रयत्न सरपंचांनी केला पाहिजे. शिक्षण सभापती आशा पाटील यांनीही प्रकल्प योग्यरीतीने राबविण्याचे आवाहन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्ह्यातील प्रकल्प राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल यासाठी प्रयत्न करुया. यासाठी ग्रामपंचायतींना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी जबाबदारी माझी राहील. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, तो यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

कार्यशाळेत प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे टप्पे, उपक्रम, अंमलबजावणीची पद्धती याविषयी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांनी मार्गदर्शन केले.

गटविकास अधिकारी, उपअभियंते, शाखा अभियंते, विस्तार अधिकारी, गटसंसाधन कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक आदी सहभागी झाले. पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने आयोजन केले.

----------