अनेक लहान ध्येयांपेक्षा एकच उच्च ध्येय ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:39+5:302021-02-05T07:27:39+5:30

बिसूर (ता. मिरज) येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे ‘पोलीस व प्रशासनातील नोकरीच्या संधी` या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत ...

Set a single higher goal than many smaller ones | अनेक लहान ध्येयांपेक्षा एकच उच्च ध्येय ठेवा

अनेक लहान ध्येयांपेक्षा एकच उच्च ध्येय ठेवा

बिसूर (ता. मिरज) येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे ‘पोलीस व प्रशासनातील नोकरीच्या संधी` या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी पिंगळे म्हणाले, पौगंडावस्थेत तरुणांनी मन भरकटू न देता ध्येयनिश्चिती करावी. ध्येयपूर्तीसाठी परिस्थिती कधीही आड येत नाही. पालकांनी मुलांनाच आपली संपत्ती समजून, त्यांच्याशी मित्र म्हणूनच सोबत राहावे. प्रशासनात येणाऱ्या भावी अधिकाऱ्यांनी आई-वडील आणि मातृभूमीला कधीही विसरू नये.

याप्रसंगी पाेलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, वरद पाटील, विठ्ठल मुळीक यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच लीलावती पाटील, पोलीस पाटील सतीश पाटील, धोंडीराम पाटील, अक्षय पाटील, टी. डी. पाटील आदी उपस्थित होते.

किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनिल पाटील यांनी स्वागत केले. संयोजन प्रताप पाटील, संजय पाटील, कुलदीप पाटील, मोहन पाटील, विजय पाटील, रणजित पाटील, किशोर साळुंखे, दीपक साळुंखे, विजय घारगे, संदीप सुरवसे आदींनी केले.

फाेटाे : २५ बुधगाव १

Web Title: Set a single higher goal than many smaller ones