सचिन साठे यांची शासनाकडून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:04+5:302021-02-05T07:29:04+5:30

वाटेगाव : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू, मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन संजय साठे यांची महाराष्ट्र ...

Selection of Sachin Sathe by the Government | सचिन साठे यांची शासनाकडून निवड

सचिन साठे यांची शासनाकडून निवड

वाटेगाव : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू, मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन संजय साठे यांची महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीवर निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे अनुवाद, संपादन, आणि प्रकाशनाची सर्व कामे प्रगतिपथावर आहेत. या ग्रंथांना राज्यात, देशात व परदेशात मोठी मागणी असल्याने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संबंधित अप्रकाशित साहित्य, लेखन संशोधनाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी चरित्र साधने प्रकाशन समितीवर साठे यांची निवड करण्यात आलेली आहे. या निवडीचे पत्र महाराष्ट्र शासनाचे उपसचिव द. रा. कहार यांनी साठे यांना दिले आहे.

फोटो - २५०१२०२१-आयएसएलएम-सचिन साठे

Web Title: Selection of Sachin Sathe by the Government