मिरज मतदारसंघात सुरेश खाडे यांच्याविरोधात शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:59 PM2019-09-21T23:59:04+5:302019-09-22T00:00:22+5:30

मिरज मतदारसंघात पाच वर्षापूर्वी भाजपचे सुरेश खाडे यांनी तब्बल ६४ हजार मताधिक्याने विजय मिळविला. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा. संजय पाटील यांना सुमारे १८ हजाराचे मताधिक्य मिळाले. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी व स्वाभिमानी उमेदवारात झालेल्या मतविभाजनामुळे भाजपचे मताधिक्य कमी झाले तरी,

Search against Suresh Khade in Miraj constituency | मिरज मतदारसंघात सुरेश खाडे यांच्याविरोधात शोध सुरू

मिरज मतदारसंघात सुरेश खाडे यांच्याविरोधात शोध सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे९ हजार मतदारवाढ गत विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांची वाढलेली संख्या ९८००, लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेली संख्या ३२६०.

सदानंद औंधे ।
मिरज : गेल्या पाच वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य देणाऱ्या मिरज मतदारसंघात आगामी विधानसभेला मतदारांची संख्या नऊ हजाराने वाढली आहे. मंत्री सुरेश खाडे यांना टक्कर देण्याचे आव्हान विरोधकांसमोर आहे. मिरजेत भाजपचे तगडे उमेदवार मानले जाणारे मंत्री खाडे यांच्याविरोधात यावेळी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, याबाबत उत्सुकता आहे.

मिरज मतदारसंघात पाच वर्षापूर्वी भाजपचे सुरेश खाडे यांनी तब्बल ६४ हजार मताधिक्याने विजय मिळविला. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा. संजय पाटील यांना सुमारे १८ हजाराचे मताधिक्य मिळाले. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी व स्वाभिमानी उमेदवारात झालेल्या मतविभाजनामुळे भाजपचे मताधिक्य कमी झाले तरी, गत विधानसभा निवडणुकीएवढीच ९२ हजार मते लोकसभेसाठी मिळाली आहेत. गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवून २० हजार मते मिळविल्यानंतरही आ. खाडे यांनी ६४ हजार मताधिक्याने विजय मिळविला होता. गेल्या पाच वर्षात मिरज तालुक्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळविणाºया भाजपने लोकसभा निवडणुकीत पुन्हा मताधिक्य मिळवून वर्चस्व राखले आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपने मताधिक्य मिळविल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आहे. मिरज पूर्व भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे.

मिरज मतदारसंघात दलित व मुस्लिम मतांची संख्या लक्षणीय असल्याने गत विधानसभा निवडणुकीत आ. सुरेश खाडे यांना ६४ हजाराचे मताधिक्क्य मिळाले असले तरी, शहरात मात्र केवळ १० हजाराचे मताधिक्य होते. मतदारसंघातील मालगाव, बेडग, म्हैसाळ, आरग, भोसे, कवलापूर या प्रमुख गावांसह ४९ पैकी ४८ गावात आ. सुरेश खाडे यांनी मताधिक्य मिळविले. केवळ मल्लेवाडी गावात राष्टÑवादी उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांनी ५५७ मतांची आघाडी मिळाली होती. मिरज मतदार संघातून तिसऱ्यांदा कोणाला संधी मिळत नाही, असा समज आहे. मात्र मंत्री खाडे सलग तिसºयांदा निवडून येण्याचा विक्रम करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मिरजेतून दोन वेळा निवडून येणाºया खाडे यांना कॅबिनेट मंत्रीपद असल्याने भाजप कार्यकर्त्यांत उत्साह आहे.

वाढलेला टक्का चर्चेचा
२०१४ चे विधानसभा निवडणूक मतदान असे : आ. सुरेश खाडे ६४०६७ मते, तानाजी सातपुते (शिवसेना) २०१६०, सिध्दार्थ जाधव (काँग्रेस) २९७२८, बाळासाहेब होनमोरे (राष्टÑवादी) १०९९९, चंद्रकांत सांगलीकर (अपक्ष) २१५९८. मतदारसंघातील एकूण गावे ४९, एकूण मतदान केंद्रे ३१०, एकूण मतदार ३ लाख २५ हजार ४४५, पुरुष १ लाख ६६ हजार ९७६, स्त्रिया १ लाख ५८ हजार ४५३, तृतीयपंथी १६. गत विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांची वाढलेली संख्या ९८००, लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेली संख्या ३२६०.

Web Title: Search against Suresh Khade in Miraj constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.