शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी सभापतीपदी संतोष पाटील बिनविरोध

By admin | Updated: September 8, 2015 23:03 IST

राष्ट्रवादीची माघार : नाराजांचे बंड झाले थंड; मदन पाटील यांची मात्रा बंडखोरांना लागू

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संतोष शिवदास पाटील यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांनी अर्ज मागे घेतला. सभापती पदावरून सत्ताधारी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नाराजीवर मदन पाटील यांची मात्रा चांगलीच कामी आल्याने, नाराजांचे बंड थंड झाले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता स्थायी समिती सदस्यांची सभा झाली. सभेत अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हारूण शिकलगार यांनी अर्ज माघारीची विनंती केली. त्यानंतर मोहिते यांनी अर्ज मागे घेतल्याने संतोष पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. सभापती पदावरून काल सोमवारी काँग्रेसअंतर्गत नाराजीचा विस्फोट झाला होता. सभापती पदासाठी इच्छुक असलेल्या दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. दुपारनंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. त्यात एका काँग्रेसच्या नगरसेवकाने दूरध्वनी बंद ठेवल्याने पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. रात्री दिलीप पाटील यांच्याशी मदन पाटील यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर पाटील यांची नाराजी दूर झाली. पाटील सभेला उपस्थित राहिले असले तरी, त्यांनी अजून स्थायी सदस्यपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतलेला नाही. शिवाजी दुर्वे यांनाही काही सदस्यांनी भेटून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुर्वे यांनी रात्री बरीच आदळ आपट केली. अखेर त्यांनी मदन पाटील यांचा शब्द मोडणार नसल्याचे सांगून या वादावर पडदा टाकला. सभापती पदावरून निर्माण झालेले नाराजीनाट्य संपुष्टात आल्याने काँग्रेसनेही सुस्कारा सोडला. (प्रतिनिधी)विकासाभिमुख कारभार करू : पाटीलकोण काय म्हणाले?काँग्रेसमध्ये नाराजी कुठेही नव्हती. इच्छुकांतील सर्वांचे समाधान करणे मदन पाटील यांना अवघड होते. उर्वरितांनाही पालिकेत पदे मिळणार आहेत. मदनभाऊंचे नेतृत्व सर्वांनी मान्य केले असून त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या दरबारी ‘देर है, लेकिन अंधेर नही.’- विवेक कांबळे, महापौरसर्वांना पदे मागण्याचा अधिकार आहे. त्यातून काही वाद झाला असेल. पण मदनभाऊंनी आदेश दिल्यानंतर सर्व सदस्यांनी तो स्वीकारला. काँग्रेस एकसंध असून कोणताही वाद नाही. यापुढे सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन काम करणार आहोत. - किशोर जामदार, गटनेतेनाराजी अजून कायमसभापती पदाची संधी हुकलेल्या दिलीप पाटील यांची नाराजी अजूनही कायम आहे. मदनभाऊंचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. त्यांच्या शब्दापुढे जाणार नाही, असे स्पष्ट करीत पाटील यांनी, स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा मागे घेतला नसल्याचे सांगितले. मदनभाऊ सांगतील, तर सभेला उपस्थित राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.