Sangli ZP Election Results 2026: गोपीचंद पडळकरांनी गड राखला; जत तालुक्यात भाजपचा झेंडा, विरोधकांची आघाडी निष्प्रभ
By अशोक डोंबाळे | Updated: February 9, 2026 14:21 IST2026-02-09T14:19:15+5:302026-02-09T14:21:24+5:30
जत : जत तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. आमदार ...

संग्रहित छाया
जत : जत तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे सर्व प्रमुख पक्ष एकत्र आले होते. मात्र, या संयुक्त आघाडीला भाजपने जोरदार धक्का देत ९ जिल्हा परिषद गटापैकी चक्क ८ गटांवर विजय मिळवला. पंचायत समितीच्या १८ जागांपैकी भाजप १२, राष्ट्रवादी अजित पवार गट २, काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत.
जत तालुक्यातील एकूण नऊ जिल्हा परिषद गटांपैकी तब्बल आठ गट भाजपने जिंकले असून केवळ एका गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला यश मिळाले आहे. या निकालामुळे जत तालुक्यात भाजपचे संघटन अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी फटाके फोडून, मिठाई वाटून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. विरोधकांनी सर्व शक्ती एकवटूनही अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्या गोटात निराशा पसरली आहे.
जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार
शेगाव : शिवाजी खिलारे (भाजप)
मुचंडी : रमेश देवर्षी (भाजप)
बनाळी : सुनील पवार (भाजप)
डफळापुर : स्वप्नाली मासाळ (भाजप)
बिरुळ : शिल्पा जीवनावर (भाजप)
उमदी : याळगोडा तोरणे (भाजप)
संख : कविता पाटील (भाजप)
दरीबडची : सरदार पाटील (भाजप)
जाडर–बोबलाद : सावित्री रवी तमन्नगोडा पाटील : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
पंचायत समितीचे विजयी उमेदवार
कल्पना अंकलगी : राष्ट्रवादी (अजित पवार)
शालन ताई कोरे : राष्ट्रवादी (अजित पवार)
संगीता सावंत (काँग्रेस)
उत्तमराव कट्टीमनी (भाजप)
सदाशिव दर्गाकर (भाजप)
रवीकुमार बगली (भाजपा)
लक्ष्मण चव्हाण (काँग्रेस)
नकुसा शेंडगे (भाजपा)
सुनिता बेडगे (भाजप)
विना बिराजदार (भाजप)
प्रमोद सावंत (काँग्रेस)
विजय रुपनर (भाजप)
सचिन बोराडे (भाजप)
अर्चना पाटील (भाजप)
महेश गावडे (भाजप)
मनीषा दुधाळ (भाजप)
बसवराज घेज्जी (काँग्रेस)
मीनाक्षी अभंगे (भाजप)