सांगली जिल्हा परिषदेत सर्वाधिक मोठा पक्ष भाजप; राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस, शिंदेसेनेची जोरदार मुसंडी

By अशोक डोंबाळे | Updated: February 9, 2026 13:49 IST2026-02-09T13:48:34+5:302026-02-09T13:49:23+5:30

एकही पक्षाला नाही स्पष्ट बहुमत 

Sangli ZP Election Results 2026 BJP candidates are leading in 18 out of 61 seats of Sangli Zilla Parishad | सांगली जिल्हा परिषदेत सर्वाधिक मोठा पक्ष भाजप; राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस, शिंदेसेनेची जोरदार मुसंडी

सांगली जिल्हा परिषदेत सर्वाधिक मोठा पक्ष भाजप; राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस, शिंदेसेनेची जोरदार मुसंडी

सांगली : जिल्हा परिषदेच्या ६१ जागांपैकी १८ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. जिल्हा परिषदेतील सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष असून त्यांचे १५ उमेदवार आघाडी आहेत. जिल्हा परिषदेत एकही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

शिंदेसेनेनेही नव्याने चार जागांची भर घालत सात जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसचे ११ उमेदवार विजय झाले असून कडेगाव, जत, मिरज तालुक्यात चांगले यश मिळाले आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सात तर उद्धवसेनेनेही खाते खोले असून वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गटातून अभिजित पाटील विजयी झाले आहेत.

जनसुराज्य, रयत क्रांती आघाडीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविली आहे. जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करतांना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.

आघाडीसह विजयी जागांचे पक्षीय बलाबल

  • भाजप - १८
  • शिवसेना -०७
  • उद्धवसेना - ०१
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - ०७
  • काँग्रेस - ११
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - १५
  • जनसुराज्य - १
  • रयत क्रांती - १

Web Title : सांगली जिला परिषद में भाजपा आगे; राकांपा, कांग्रेस को भी फायदा

Web Summary : सांगली जिला परिषद चुनाव में भाजपा 18 सीटों के साथ आगे है। राकांपा (अजित पवार) को 15, कांग्रेस को 11 और शिंदे सेना को 7 सीटें मिलीं। किसी भी दल को स्पष्ट बहुमत नहीं, गठबंधन महत्वपूर्ण।

Web Title : BJP Leads in Sangli Zilla Parishad; NCP, Congress Gain Ground

Web Summary : BJP leads with 18 seats in Sangli Zilla Parishad elections. NCP (Ajit Pawar) secured 15, Congress 11, and Shinde's Sena 7. No party achieved a clear majority, making coalition crucial for power.