मिरज : महापालिका निवडणुकीत मिरजेत यंदा राजकीय चित्र बदलले असून, भाजपचे संख्याबळ घटले आहे. प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादीने (अजित पवार) नऊ जागांवर विजय मिळवत चांगली कामगिरी केली. शिंदेसेनेने खाते उघडले, तर राष्ट्रवादीची (शरद पवार) मिरजेत मोठी पीछेहाट झाली आहे.गत निवडणुकीत भाजपचे १२ सदस्य होते; मात्र यावेळी भाजपला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीचे (शरद पवार) पूर्वी ८ सदस्य होते, मात्र यंदा या पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतील सर्व प्रमुख नेते अजित पवार गेले. याचा थेट फायदा राष्ट्रवादीला (अजित पवार) झाला. राष्ट्रवादीचे (अजित पवार) भाजपइतकेच नऊ सदस्य निवडून आले आहेत. काँग्रेसचे चार सदस्य निवडून आले, प्रभाग तीनमधून शिंदेसेनेचे सागर वनखंडे यांनी पक्षाचे खाते उघडले.प्रभाग चार व सातमध्ये भाजपचे सर्व आठ उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपचा केवळ एकच उमेदवार निवडून आला. येथे भाजपला तीन जागांचा फटका बसला. प्रभाग पाचमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ. पंकज म्हेत्रे यांनी राष्ट्रवादीच्या करण जामदार यांना चांगली लढत दिली, मात्र भाजपमुळे मतांचे विभाजन झाल्याने सुमारे ३५० मतांनी त्यांचा पराभव झाला. प्रभाग तीनमध्येच राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी दुर्वे यांनी केवळ दहा मतांच्या फरकाने भाजप उमेदवाराचा पराभव केला.प्रभाग क्रमांक २०मध्ये आमदार इद्रीस नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी यांच्यासह राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) उमेदवारांचा पराभव केला. योगेंद्र थोरात, स्वाती पारधी, मालन हुलवान, दिगंबर जाधव, अभिजित हारगे, अनिता वनखंडे व नर्गिस सय्यद या सात माजी नगरसेवकांना व त्यांच्या कुटुंबीयांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला आहे.संजय मेंढे, बबिता मेंढे, करण जामदार, मैनुद्दीन बागवान, गणेश माळी, संदीप आवटी, निरंजन आवटी व अतहर नायकवडी हे आठ सदस्य पुन्हा निवडून आले आहेत. यावेळी मोहन वाटवे, अपर्णा शेटे, विद्या नलवडे, सागर वनखंडे, रेश्मा चौधरी, शिरीन पिरजादे, बिलकीस शेख, अश्विनी कोळी, रेखा कांबळे, उज्ज्वला कांबळे, दयानंद खोत व बानू जमादार हे १३ सदस्य प्रथमच निवडून आले आहेत. यामध्ये सागर वनखंडे हे सर्वांत तरुण नगरसेवक आहेत.प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादीने (अजित पवार) उमेदवारी नाकारलेल्या ॲड. बिलकीस शेख यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून विजय मिळवला. तर प्रभाग तीनमध्ये भाजपने उमेदवारी नाकारलेल्या शिवाजी दुर्वे यांच्या पत्नी शैला दुर्वे या राष्ट्रवादीकडून (अजित पवार) निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान यांनी सुमारे ६ हजार व काँग्रेसच्या संजय मेंढे-बबिता मेंढे या दाम्पत्याने व भाजपच्या बानू जमादार यांनी सुमारे ५ हजारांच्या फरकाने विजय मिळवला.
Web Summary : Miraj saw a shift in power. BJP seats decreased. NCP (Ajit Pawar) gained significantly. Shinde's Sena opened its account. NCP (Sharad Pawar) suffered losses.
Web Summary : मिराज में सत्ता परिवर्तन दिखा। भाजपा की सीटें घटीं। एनसीपी (अजित पवार) को बड़ा फायदा। शिंदे सेना ने खाता खोला। एनसीपी (शरद पवार) को नुकसान हुआ।