शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका प्रशासनाचे बजेट मंगळवारी स्थायीकडे, पहिल्याच सभेत दीड कोटीच्या कामांना मंजुरीचे विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:24 IST

सांगलीकरांना कोणत्या नव्या सुविधा मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष

सांगली : महापालिकेत अडीच वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधीची राजवट सुरू झाली आहे. महापौर, उपमहापौर, गटनेत्यांच्या निवडीनंतर स्थायी समितीही अस्तित्वात आली. आता स्थायी समितीच्या मंगळवार दि. १७ रोजी होणाऱ्या पहिल्याच सभेत आयुक्त सत्यम गांधी हे २०२६-२७ चे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. यात सांगलीकरांना कोणत्या नव्या सुविधा मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सभेत सुमारे दीड कोटीच्या कामांच्या मंजुरीचे विषयही अजेंड्यावर घेण्यात आले आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीची पहिली सभा मंगळवारी सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या सभेच्या अजेंड्यावर यंदाच्या अंदाजपत्रकाचा विषय आहे. आयुक्त गांधी यांनी यंदाच्या अंदाजपत्रकावर अंतिम केला आहे. हे बजेट सुमारे ५० कोटी रुपये तुटीचे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

त्यामुळे प्रशासनाकडून यंदाच्या अंदाजपत्रकात नव्या सुविधांना कितपत स्थान देण्यात आले आहे, याविषयी साशंकता आहे. याशिवाय घरपट्टी, पाणीपट्टीव्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर स्त्रोत वाढविण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थायी समितीकडून अभ्यास करून आपल्या शिफारशीसह मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महासभेला बजेट सादर करण्यात येणार आहे.

हिराबाग वाॅटर वर्क्स येथील इमारतीच्या दुरुस्तीसाठी ३४ लाख ४६ हजार रुपयांची निविदा मागविण्यात आली होती. या कमी दराची २८ लाख २५ हजारांची निविदा मंजुरीचा विषय सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आला आहे. याशिवाय मिरज शहरात विविध ठिकाणी दीपस्तंभ उभारण्याची ४९ लाख ९८० हजार व मिरजेतील वखार येथील पंपिंग स्टेशनमध्ये ट्रान्सफाॅर्मर व इतर कामांची ५५ लाख २७ हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्याच्या विषयावरही चर्चा होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Corporation budget to standing committee, approvals expected.

Web Summary : Sangli Municipal Corporation's budget will be presented to the standing committee. The meeting will discuss a deficit budget and potential new facilities. Approvals for works worth ₹1.5 crore, including repairs and infrastructure projects, are on the agenda.