सांगलीच्या विवाहितेची अंकलीमध्ये नदीत उडी, शोधकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:08 IST2026-01-14T17:07:52+5:302026-01-14T17:08:54+5:30
नदीत पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्यामुळे शोधकार्यात अडथळे

सांगलीच्या विवाहितेची अंकलीमध्ये नदीत उडी, शोधकार्य सुरू
सांगली : अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीवरील पुलावरून प्राजक्ता योगेश देसाई (वय २४, रा. गावभाग, सांगली) या विवाहितेने नदीत उडी टाकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने नदीपात्रात तिचा शोध घेतला. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत प्राजक्ता सापडली नाही.
कृष्णा नदीपात्रात अंकली पुलावरून विवाहित महिलेने थेट पाण्यात उडी मारल्याची घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. काही जणांनी हा प्रकार पाहिला. त्यामुळे पुलावर गर्दी जमली. सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवला. ग्रामीण पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स या आपत्कालीन पथकास कळवले. त्यानुसार पथकाने नदीपात्रात उतरून शोधकार्य सुरू केले.
पोलिसांच्या चौकशीत नदीत उडी टाकणाऱ्या महिलेचे नाव प्राजक्ता देसाई असे असल्याचे समजले. विवाहितेने ज्या ठिकाणी उडी मारली, त्या ठिकाणी नदीत पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. तरीही रेस्क्यू फोर्सने सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवले. बुधवारी पुन्हा नदीपात्रात विवाहितेचा शोध घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.