शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: "महागाई मॅन आता आणखी वसुली करेल"; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
5
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
6
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
8
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
9
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
10
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
11
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
12
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
13
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
14
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
15
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
16
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
17
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
18
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
19
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
20
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा नियोजनच्या ७५१ कोटींच्या आराखड्यास मान्यता; वन्यजीव हल्ले रोखण्यासाठी ‘ए-आय’ अलार्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:55 IST

वीस हिरकणी कक्षांसाठी सव्वादोन कोटी

सांगली : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. २०२६-२७ वर्षाच्या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनचा ७५१ कोटी आठ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. मागील आराखड्यापेक्षा २०६ कोटी रुपये राज्य शासनाकडे जादा मागितले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी घटक कार्यक्रम मिळून २०६ कोटी रुपयांच्या वाढीव मागणीसह एकूण ७५१ कोटी आठ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. हा आराखडा आज होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत सादर करण्यात येणार आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रारूप आराखड्यानुसार सर्वसाधारण योजनेसाठी ६६३ कोटी ८० लाख, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी ८६ कोटी, तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी एक कोटी २८ लाख रुपयांची तरतूद आहे. मागील वर्षी ६३२ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील १०० टक्के निधी शासनाकडून मिळाला आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, पर्यटन, वीजपुरवठा अशा सर्व क्षेत्रांसाठी वाढीव निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्व शासकीय कार्यालयांनी निधी वेळेत खर्च करून दर्जेदार कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लोकप्रतिनिधींसोबत समन्वय ठेवून कामे मार्गी लावावीत, दिरंगाई टाळावी, तसेच २५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत पदभरती व आकृतिबंधाचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, सदाभाऊ खोत, डॉ. सुरेश खाडे, डॉ. विश्वजीत कदम, गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

गरोदर मातांसाठी ‘क्लिनिक कॉर्नर’

प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण केंद्रस्तरावर गरोदर मातांच्या तपासणीसाठी स्वतंत्र ‘क्लिनिक कॉर्नर’ उभारले जाणार आहेत. मातृआरोग्य अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनमधून दोन कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

वीस हिरकणी कक्षांसाठी सव्वादोन कोटी

जिल्हा व तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयांत महिलांसाठी २० बंदिस्त स्तनपान कक्ष उभारले जाणार आहेत. कामकाजी मातांसाठी सन्मानजनक सुविधा उपलब्ध होणार आहेत, यासाठी सव्वादोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी ‘ए-आय’ अलार्म

बिबटप्रवण अतिसंवेदनशील भागात ए-आय आधारित अलार्म प्रणाली बसविण्यात येणार आहे. वन्यजीव हल्ले रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार आहे. यासाठी प्राथमिक ५८ लाख ५० हजार रुपयांची तरतूद जिल्हा नियोजनमध्ये धरली आहे.

वीज पायाभूत सुविधांसाठी ४८.८५ कोटी

महावितरणमार्फत ४०१ रोहित्रे, उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची उभारणी केली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम होणार आहे. यासाठी ४८ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद जिल्हा नियोजनमधून केली आहे. हा निधी अपुरा पडणार असल्यामुळे शासनाकडून विशेष बाब म्हणून निधीचा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli District Plan Approved: AI Alarms for Wildlife Attack Prevention

Web Summary : Sangli's ₹751 crore district plan approved focusing on development across sectors like agriculture, health, and education. Key initiatives include clinics for pregnant women, lactation rooms, AI alarms to prevent wildlife attacks, and improved power infrastructure.