शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँक 'लाडकी बहीण'साठी झिरो बॅलन्सवर खाती उघडणार

By अशोक डोंबाळे | Updated: July 10, 2024 18:25 IST

जिल्हा बँक केंद्र व राज्य शासनाकडून जाहीर होणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नेहमीच अग्रेसर

सांगली : शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये महिलांची झिरो बॅलन्सवर बचत खाती उघडण्यात येणार आहेत. याचा लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बँक केंद्र व राज्य शासनाकडून जाहीर होणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नेहमीच अग्रेसर आहे. शेतकरी, महिला, तरुण यांच्यासह समाजातील सर्वच घटकांतील लाभार्थींना शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळेल, यासाठी बॅँक प्रयत्नशील असते. शासनाने आता महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे.शहरासह ग्रामीण भागात अनेक महिलांची बँक खाती नाहीत. नवीन खाती उघडताना किमान रक्कम शिल्लक ठेवावी लागतात. मात्र, आता जिल्हा बँकेने लाडकी बहीण योजनेसाठी खाती उघडणाऱ्या महिलांची शून्य रक्कम (झिरो बॅलन्स) खाती उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखांना कळविण्यात आले आहे. कोणीही महिला बँक खाते काढण्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे.

मुलींच्या लग्नासाठी बँकेची 'लग्नगाठ कर्ज योजना'मुलींच्या लग्नासाठी जिल्हा बँक ६ टक्के व्याजदराने सोसायटीमार्फत ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. यासाठी बँकेने लग्नगाठ कर्ज योजना सुरू केली आहे. याबाबतचे परिपत्रक सर्व शाखांना पाठविले आहे. या योजनेसाठी बॅँकेने कोरडवाहू क्षेत्रावर प्रतिएकर २० हजार रुपये, तर बागायती क्षेत्रावर ३० हजार रुपये मात्र जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा गरजूंनी लाभा घ्यावा, असे आवाहन मानसिंगराव नाईक यांनी केले.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक