शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली चेंबर आॅफ कॉमर्सची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: August 14, 2015 00:04 IST

त्रैवार्षिक निवडणूक : तेराजणांची माघार; ज्येष्ठ व्यापाऱ्यांच्या प्रयत्नांना यश

सांगली : येथील व्यापाऱ्यांची संस्था असलेल्या चेंबर आॅफ कॉमर्सची निवडणूक बिनविरोध झाली. अर्ज माघारीचा गुरुवारी अंतिम दिवस होता. यावेळी तेराच अर्ज शिल्लक राहिल्याने सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सनतकुमार आरवाडे यांनी जाहीर केले. चेंबर आॅफ कॉमर्सच्या तेरा संचालक मंडळासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. तेरा जागांसाठी एकूण २६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामधील तेरा जणांनी माघार घेतल्याने, उर्वरित तेरा जणांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये रमणिक वृजदास दावडा, अण्णासाहेब बळवंत चौधरी, श्रीशैल बसगोंडा पारगोंड, प्रशांत बाळासाहेब पाटील, हरिश्चंद्र सिदू पाटील, समीर शिवलिंग साखरे, सतीश रतिलाल पटेल, विजय कुबेर निरवाणे, श्रीगोपाळ मांगीलाल मर्दा, दीपक नाभिराज चौगुले, शरद जयंतीलाल शहा, सचिन सुरेश घेवारे, अमरसिंह अण्णासाहेब देसाई यांचा समावेश आहे. अर्ज माघारीचा आज अंतिम दिवस असल्यामुळे ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. रिंगणातील सर्व उमेदवारांनी यासाठी आपली संमती दर्शवली. निवडणूक मंडळाचे सदस्य सनतकुमार आरवाडे, जयंतीलाल शहा, रामभाऊ अडगोळ यांच्याकडे सर्वच उमेदवारांनी आपापल्या उमेदवारी माघारीचे अर्ज दिले. त्यानंतर निवडणूक मंडळ व रिंगणातील सर्वच उमेदवारांची चेंबर आॅफ कॉमर्समध्ये बैठक झाली. यामध्ये तेरा जणांची नावे संचालक मंडळासाठी निश्चित करण्यात आली. नव्या संचालक मंडळाचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. (प्रतिनिधी)इच्छुकांच्या अनेकांमध्ये नाराजी संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्याने अनेक इच्छुक नाराज झाले आहेत. विकास मोहिते, अभय मगदूम, सुनील पट्टणशेट्टी, बी. एल. पाटील आदींनी उमेदवारी दाखल केली होती. बैठकीमध्ये ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. यामध्ये तेरा जणांची नावे वगळण्यात आली.