शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

‘सनातन’ने प्रकाश आंबेडकरांविरुद्ध तक्रार द्यावीच

By admin | Updated: October 1, 2015 00:42 IST

गौतमीपुत्र कांबळे : सामना करण्यास डाव्या चळवळीचे कार्यकर्ते सज्ज

सांगली : सनातन संस्थेवर बंदीची मागणी तसेच डाव्यांकडेही नक्षलवाद असल्याचा इशारा दिल्याबद्दल अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध सनातन संस्थेला तक्रार द्यायची असेल, तर त्यांनी द्यावी. त्यांच्या या गोष्टीचा सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत, असा इशारा सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जाती मुक्ती आंदोलनाचे प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. सनातन संस्था जर मारामारी, धमक्या, हिंसा, खून अशी भाषा करीत असेल, तर डाव्यांकडेही नक्षलवाद आहे, हे विसरू नये, असा इशारा काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. कांबळे म्हणाले की, या वक्तव्याबद्दल जर सनातन संस्थेस तक्रार करायची असेल, तर त्यांनी लवकर करावी. आमची संघटना त्याचा सामना करण्यास तयार आहे. सनातन संस्थेचे साधक वेगवेगळ्या हिंसाचार प्रकरणात अडकले आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणीही त्यांचाच साधक संशयित म्हणून सापडला आहे. त्यांनी हिंसा अशीच चालू ठेवली, तर हिंसेला हिंसेने उत्तर देणारे लोक या समाजात तयार होतील. नंतर या गोष्टी कोणालाच रोखता येणार नाहीत, असेही मत आंबेडकर यांनी मांडले होते. बंदीच मागणीबाबत सनातनने तक्रार करून दाखवावीच, असे आव्हानही देण्यात आले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, गौतम लवटे, कॉ. उमेश देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)