पूरबाधितांच्या बँक खात्यावर ७३ लाख रुपये जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:30 IST2021-08-19T04:30:59+5:302021-08-19T04:30:59+5:30

सांगली : महापुरामुळे पाणी घरात येऊन नुकसान झालेल्या कुटुंबाला १० हजार रुपये मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत ...

Rs 73 lakh deposited in the bank account of the flood victims | पूरबाधितांच्या बँक खात्यावर ७३ लाख रुपये जमा

पूरबाधितांच्या बँक खात्यावर ७३ लाख रुपये जमा

सांगली : महापुरामुळे पाणी घरात येऊन नुकसान झालेल्या कुटुंबाला १० हजार रुपये मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत ७३६ कुटुंबांना ७३ लाख ६० हजार रुपयांची मदत बॅंक खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, शिराळा तालुक्यातील ७३६ पूरबाधित कुटुंबांच्या बॅंक खात्यांवर रुपये ७३ लाख ६० हजार इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

वाळवा तालुका व अपर आष्टा तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पूरबाधित कुटुंबांना अनुक्रमे ३ कोटी ६० लाख आणि १ कोटी २३ लाख प्रमाणे अनुदान वाटप करण्यासाठी बॅंकेत जमा करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

पलूस तालुक्यात ४ कोटी ७९ लाख १० हजार रुपये, अपर तहसीलदार, सांगली ग्रामीण क्षेत्रामध्ये ३ कोटी ११ लाख, मिरज तालुक्यात ५३ लाख ३० हजार, सांगली-मिरज महानगरपालिका क्षेत्रासाठी ९ कोटी ७३ लाख एवढे अनुदान लवकरच बॅंकेमध्ये जमा होत असून, लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल.

जिल्ह्यातील २२ हजार ९९४ बाधित कुटुंबांच्या खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसांत रक्कम जमा होणार असून, उर्वरित बाधित कुटुंबांना अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत शासनाकडे अनुदान मागणी करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Rs 73 lakh deposited in the bank account of the flood victims