वशी येथे रस्ते सुशोभिकरण काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:02+5:302021-02-05T07:29:02+5:30

वशी : वाळवा आणि शिराळा तालुक्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासाकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ...

Road beautification work started at Vashi | वशी येथे रस्ते सुशोभिकरण काम सुरु

वशी येथे रस्ते सुशोभिकरण काम सुरु

वशी : वाळवा आणि शिराळा तालुक्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासाकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.

वशी (ता. वाळवा) येथे देशमुख गल्लीत जनसुविधा योजनेंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे उद्घाटन खासदार माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय व नियोजित ग्रामसचिवालयाची पाहणी खासदार माने यांनी केली. शिवसेना नेते अभिजीत पाटील, सरपंच जयश्री पाटील, उल्हास पाटील, अतुल पाटील, अमोल देशमुख, अमोल निकम, राहुल पाटील, राजाराम गुरव, नितीन देशमुख यावेळी उपस्थित होते.

फोटो - २८०१२०२१-आयएसएलएम-वशी न्यूज १

वशी (ता. वाळवा) येथे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते विकासकामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी अभिजीत पाटील, जयश्री पाटील, उल्हास पाटील, अतुल पाटील, अमोल देशमुख उपस्थित होते.

Web Title: Road beautification work started at Vashi