शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: डिजिटल अरेस्टची भीती घालून सावळजमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाला ५९ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:42 IST

तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी दाखवली अटकेची भीती

तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथील एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत अटकेची भीती दाखवून ५९ लाख नऊ हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अण्णासाहेब बाळगोंडा पाटील (६१, रा. सावळज) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी अण्णासाहेब पाटील हे त्यांच्या घरी असताना, ८ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत त्यांना अज्ञात व्यक्तींचे व्हॉट्सॲप कॉल आले. संशयित आरोपी अजय पाटील आणि दया नायक यांनी स्वतःला पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. त्यांनी फिर्यादींना व्हॉट्सॲपवर सीबीआयचा लोगो, सुप्रीम कोर्ट, इन्कम टॅक्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावे बनावट पत्रे पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.याप्रकरणी अजय पाटील आणि दया नायक यांच्याविरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३८, ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (क), ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नागरिकांनी अशा बनावट कॉल्सना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.भीतीपोटी फिर्यादीने संशयिताच्या खात्यावर पाठवले पैसेआरोपींनी फिर्यादींना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून, त्यांना अटक करण्याची भीती दाखवली आणि गंभीर परिणामांची धमकी दिली. या भीतीपोटी फिर्यादीने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांवर वेळोवेळी एकूण ५९ लाख ९ हजार रुपये पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Retired Teacher Duped of ₹59 Lakh in Digital Arrest Scam

Web Summary : A retired teacher from Savlaj, Sangli, lost ₹59 lakh to fraudsters posing as CBI officers. They used fake documents and threats of arrest to extort money. Police have registered a case and are investigating.