आदर्शच्या फार्मसी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:08+5:302021-04-11T04:26:08+5:30

फोटो : विटा येथील आदर्श फार्मसी महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील व संस्थेचे अध्यक्ष ॲड. वैभव ...

The resounding success of Adarsh's pharmacy students | आदर्शच्या फार्मसी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

आदर्शच्या फार्मसी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

फोटो : विटा येथील आदर्श फार्मसी महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील व संस्थेचे अध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत कांबळे, प्राचार्य डॉ. निरंजन महाजन उपस्थित होते.

विटा : राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट या परीक्षेत विटा येथील आदर्श औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. उच्चशिक्षणासाठी कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत महाविद्यालयाची प्रियंका जाधव, ऐश्वर्या करपे व राधिका कांबळे यांनी यश संपादन केले.

विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग, विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सराव चाचण्या तसेच विविध विषयांचे व्याख्याने, प्रत्येक विषयाचे प्रश्नमंजूषा सेट तसेच या परीक्षेच्या तयारीसाठी जीपॅट प्रमुख प्रा. डॉ. कैलास माळी आणि प्रा. सुमय्या आत्तार यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांचे फलित म्हणून यशाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाची घोडदौड चालू अल्याचे प्राचार्य डॉ. निरंजन महाजन यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲड. वैभव पाटील, कार्यकारी संचालक पी. टी. पाटील, प्रशांत कांबळे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिंनीचा सत्कार करण्यात आला.

Web Title: The resounding success of Adarsh's pharmacy students