शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

धनगावात वसुली द्या आणि सोन्याची अंगठी जिंका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST

भिलवडी : पलूस तालुक्यातील धनगाव ग्रामपंचायतीने ‘थकीत कर भरा आणि सोन्याची अंगठी जिंका,’ अशी अभिनव बक्षीस योजना सुरू ...

भिलवडी

: पलूस तालुक्यातील धनगाव ग्रामपंचायतीने ‘थकीत कर भरा आणि सोन्याची अंगठी जिंका,’ अशी अभिनव बक्षीस योजना सुरू केली आहे. याचा सकारात्मक परिणाम होऊन नागरिकांकडून कर भरण्यास प्रतिसाद मिळत आहे.

सरपंच सतपाल साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपसरपंच कुसुम साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य संदीप यादव, रमेश पाटील, हणमंत यादव, आशा केवळे, आरती साळुंखे, स्वाती यादव, काजल मदने, ग्रामसेवक प्रकाश माळी आदी उपस्थित होते. या आर्थिक वर्षासह पाठीमागील थकीत अशी सत्तावीस लाख रुपये घरपट्टी, पाणीपट्टी येणे बाकी आहे. मार्चअखेर वसूल करणे अपेक्षित आहे. यासाठी नावीन्यपूर्ण करवसुली व प्रोत्साहनपर बक्षीस योजना लागू करण्यात आली आहे. नियमित व थकीत वसुली जमा करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास अनुक्रमे सात, पाच व तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी बक्षीस मिळणार आहे. चार ते आठ क्रमांक विजेत्यांना पैठणी साडी, नऊ ते पंधरा क्रमांक विजेत्यांना टेबल फॅन, सोळा ते पंचवीस क्रमांक विजेत्यांना मिक्सर अशी पंचवीस बक्षिसे आहेत. सत्तर टक्के रक्कम वसूल झाल्यास या योजनेंतर्गत लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.

कोट

गावातील सर्व नागरिकांनी ३१ मार्चअखेर घरपट्टी व पाणीपट्टी भरल्यास ग्रामपंचायतीची वसुली पूर्ण होईल. त्यामधून विविध विकासकामे पूर्ण करण्यास निधी उपलब्ध होईल.

-सतपाल साळुंखे, सरपंच