शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावच्या सरपंचपदी राजू जाधव यांची निवड

By admin | Updated: August 9, 2015 00:47 IST

काँग्रेसची बाजी : मनोज मिसाळ उपसरपंच

कडेगाव : कडेगावच्या सरपंचपदी काँग्रेसचे प्रशांत ऊर्फ राजू भीमराव जाधव यांची, तर उपसरपंचपदी काँग्रेसचेच मनोजकुमार पोपट मिसाळ यांची शनिवारी निवड झाली. सरपंच, उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने नऊ विरुध्द आठ मतांनी बाजी मारली. काठावरचे बहुमत असल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी लक्ष घातले आणि शनिवारी सरपंच, उपसरपंच निवडीसाठी काँग्रेस सदस्यांची बैठक घेतली. सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. बैठकीत सरपंच पदासाठी एकमत होत नव्हते. काँग्रेसचे अजित कोळी यांनी, तर आघाडीकडून मंगल चन्ने यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरला. काँग्रेसचे राजू जाधव यांनीही सरपंच पदासाठी अर्ज भरला. विशेष म्हणजे राजू जाधव यांना आघाडीचे सुरेश देशमुख सूचक आहेत. राजू जाधव यांनी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने त्यांचा सरपंच पदासाठी अर्ज ठेवला, तर अजित कोळी यांनी अर्ज माघारी घेतला. यामुळे काँग्रेसचे राजू जाधव व आघाडीच्या मंगल चन्ने यांच्यात सरपंच पदासाठी निवडणूक झाली, त्याचवेळी काँग्रेसचे मनोज मिसाळ व आघाडीचे युन्नूस पटेल यांच्यात उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. गुप्त मतदान झाले. यात सरपंच व उपसरपंच पदासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना ९, तर आघाडीच्या उमेदवारांना ८ मते मिळाली. सरपंचपदी प्रशांत ऊर्फ राजू जाधव यांची, तर उपसरपंचपदी मनोजकुमार मिसाळ यांची निवड जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (वार्ताहर)