शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आर. आर. यांच्याकडे केवळ एक जीप

By admin | Updated: September 29, 2014 00:23 IST

सांपत्तिक स्थिती : अजितराव घोरपडे, सुरेश शेंडगे, खाडे कोट्यधीश

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आर. आर. पाटील यांची ७१ लाख ९४ हजार ९६१ रुपयांची गुंतवणूक, ४९ लाख २३ हजार ७२३ रुपयांची स्थावर, तर ४ लाख ६२ हजार ८९८ रुपयांचे कर्ज आहे, तर त्याचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडे यांची गुंतवणूक १ कोटी २८ लाख ४९ हजार, ५ कोटी ९० लाखांची स्थावर, तर ३४ लाख ३ हजाराचे कर्ज आहे. आर. आर. पाटील यांनी बी. ए. नंतर एल.एल.बी पूर्ण केले आहे, तर घोरपडे यांनी बीएमसीसी, पुणेतून बी. कॉम.ची पदवी घेतली आहे.उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:च्या व त्यांच्या नावावर असणाऱ्या सर्व व्यक्तींची सांपत्तिक स्थिती जाहीर केली आहे. यातील आकडेवारी ही एकत्रित आहे. आर. आर. यांच्या नावावर रोख ५ लाख रुपये आहेत. २३ लाख ६२ हजाराच्या ठेवी, ४० हजाराची एक जीप त्यांच्या नावावर असून, ४ लाख ६२ हजार रुपयांचे स्टेट बँकेचे कर्ज आहे.अजितराव घोरपडे यांच्या नावे ४९ हजार, २ लाख ६९ हजार रुपयांच्या ठेवी, १ कोटी ७५ लाखाची स्थावर मालमत्ता, पत्नी जयमाला घोरपडे यांच्या नावे २ कोटी ३२ लाखांची स्थावर, तर आई लक्ष्मीबाई घोरपडे यांच्या नावे १ कोटी ८३ लाखांची स्थावर आहे. अनुक्रमे तिघांच्या नावे १४ लाख ८३ जार, ९ लाख ५६ हजार व ९ लाखांचे कर्ज आहे.काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेंडगे यांचे शिक्षण ११ वी पर्यंत झाले आहे. त्यांच्या नावावरील एकूण ८४ लाख ५ हजार ९९९ रुपयांच्या ठेवी, गुंतवणूक, तर ८ कोटी ३८ लाख ८५ हजार ९९९ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यात त्यांची ५ कोटी ८३ लाख, पत्नी सुवर्णा शेंडगे यांची १ कोटी ६२ लाख ४ हजार, मुलगा विजयसिंह यांच्या नावे ८0 लाख ७0 हजार, राजच्या नावे ६ लाख २५ हजार व मुलगी ६ लाख ४३ हजारांची स्थावर आहे. (वार्ताहर)