शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान, राष्ट्रपतींना नागपंचमीबाबत निवेदन

By admin | Updated: July 16, 2015 23:18 IST

भगतसिंह नाईक : २०,००० जणांच्या सह्या

शिराळा : शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी वन्यजीव कायद्यातून खास बाब म्हणून पंधरा दिवस नागपूजेसाठी शिथिलता द्यावी, यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांनी सोमवारी वीस हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दिले. यावेळी पृथ्वीसिंग नाईक उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, हा सण धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. ही परंपरा १२०० वर्षांपासून चालत आली आहे. हा सण आजही तेवढ्याच भक्तिभावे, धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो. मात्र जनहित याचिकेमुळे हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यास अडचणी आल्या आहेत. त्यामुळे या धार्मिक सणाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून नागपंचमीआधी तेरा दिवस, नागपंचमीला व दुसऱ्यादिवशी असे पंधरा दिवस कायद्यात शिथिलता करून हा सण साजरा करण्याची अनुमती मिळावी. या निवेदनासोबत नागपंचमीबाबत पौराणिक पुरावे जोडण्यात आले आहेत. या पुराव्यांचा व लोकभावनेचा विचार करून कायद्यात बदल केला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन राष्ट्रपती मुखर्जी यांना दिल्यावर याबाबत सर्व माहिती पाहून योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले, तर पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर असल्याने त्यांच्या मुख्य सचिवांकडे यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)शेट्टींची भूमिका महत्त्वाची!याबाबत अ‍ॅड. नाईक म्हणाले की, खासदार राजू शेट्टी यांना गावबंदी चुकीची आहे, तसेच खा. शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या घरात नाग सोडावेत, हे सांगणेही चुकीचे आहे. शिराळा व केंद्र शासन यामध्ये खा. शेट्टी यांची भूमिका भविष्यकाळात महत्त्वाची आहे. त्यांनी या नागपंचमीबाबत योगदान दिले आहे व ते यापुढेही देतील. सर्व राजकीय पक्ष, व्यक्ती, संघटना यांच्या प्रयत्नाला यश येईल व नागपंचमीस नक्की गैतवैभव प्राप्त होईल.