शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरच्या ‘जायंटस्’मध्ये रंगले राजकारण

By admin | Updated: March 11, 2015 00:04 IST

पक्षीय शिरकाव : सहेली व पर्ल गटात धुसफूस, आरोप-प्रत्यारोप सुरू

अशोक पाटील - इस्लामपूर सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या जायंटस् गु्रपमध्ये राजकीय पक्षांचा शिरकाव झाल्याची चर्चा सुरू आहे. प्रारंभी केवळ पुरुषवर्ग सक्रिय असणाऱ्या या ग्रुपमध्ये अलीकडील काही वर्षात महिलाही सहभागी झाल्या असून त्यांनी जायंटस् सहेली नावाने गु्रप तयार केला आहे. त्याला फुटीचे ग्रहण लागले असून इस्लामपूर येथे पूर्वीच्या जायंटस् सहेलीच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा माळी यांनी गेल्या तीन वर्षापासून वेगळी चूल मांडत, जायंटस् पर्ल हा नवीन गु्रप तयार केला आहे. महिलांच्या या दोन गटात धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.
इस्लामपूर शहरात २00१ मध्ये जायंटस् गु्रप आॅफ सहेलीची स्थापना झाली. पहिल्या अध्यक्षा होण्याचा मान प्रतिभा शहा यांना मिळाला. २00५ मध्ये डॉ. सुवर्णा माळी यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. या गु्रपमध्ये काही ठराविक समाजाच्या महिलांची मक्तेदारी वाढत गेल्याने त्यांनी सहेली गु्रपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २0१२ मध्ये जायंटस् गु्रप आॅफ पर्लची स्थापना करुन त्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु केले. या दोन्ही गु्रपमध्ये आता राजकीय पक्षांचा शिरकाव झाला असून ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये आता दोन-दोन गु्रप कार्यरत होऊ लागले आहेत. कामेरी येथे माळी यांचा पर्ल गु्रप राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संलग्नित आहे. यावर कडी करण्यासाठी जायंटस् गु्रप आॅफ सहेलीच्या अध्यक्षा सौ. जैना शहा यांनी रविवारी कामेरी येथे काँग्रेस पक्षाशी संलग्नित असलेल्या महिलांना हाताशी धरून नव्या गु्रपची स्थापना केली.
जायंटस् गु्रप आॅफ इस्लामपूर सहेलीमध्ये काही ठराविक समाजातील महिलांनाच संधी दिली जाते, असा आरोप केला जात आहे. चांगले काम करणाऱ्या इतर समाजातील महिलांना जाणीवपूर्वक डावलले जाते. त्यातूनच डॉ. माळी यांनी जायंटस् गु्रप आॅफ पर्लची स्थापना करून सवतासुभा मांडला आहे.

जायंटस् सहेली व पर्ल हे दोन्ही गु्रप राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या जायंटस् गु्रपच्या अंतर्गत सुरू आहेत. एकत्र काम करताना काही मतभेद निर्माण झाले. त्यामुळे डॉ. माळी यांनी स्वतंत्र गु्रप स्थापन केला आहे. जायंटस् गु्रप आॅफ सहेलीमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही.
- संदेश शहा, स्पेशल कमेटी
मेंबर, जायंटस् गु्रप.


जायंटस् गु्रप आॅफ पर्लमध्ये पती- पत्नी एकत्र कार्यरत असतात. त्यामुळे सामाजिक कार्यात कमी अडचणी येतात. याउलट जायंटस् सहेलीमध्ये फक्त महिला कार्यरत आहेत. हाच दोन गु्रपमधील मूलभूत फरक आहे. त्यामुळे आमच्यात कोणतेही राजकारण असण्याचे कारण नाही.
- डॉ. सौ. सुवर्णा माळी,
अध्यक्षा, जायंटस् पर्ल.