शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा नदीत उडी मारताना युवतीला पोलिसांनी अडविले

By admin | Updated: September 13, 2015 00:13 IST

संगममाहुली पुलावरील घटना

सातारा : भरदुपारी रखरखतं ऊन.. संगममाहुली पुलावर वीस ते बावीस वर्षीय युवती कट्ट्यावर उभी राहिली होती. येणारे-जाणारे वाहनचालक तिच्याकडे केवळ पाहत पुढे निघून जात होते. ती युवती मागे-पुढे पाहत पुलावर उभी.. कोणत्याही क्षणी ती पुलावरून उडी टाकण्याची शक्यता.. मात्र, याचवेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांची गाडी तेथे पोहोचली अन् त्या मुलीचे प्राण वाचले. कोरेगावहून येताना उजव्या बाजूला संगम माहुली पुलावर एक युवती कठड्यावर उभी राहिली होती. तोंडाला स्कार्प आणि पाठीवर कॉलेजची सॅक होती. बराचवेळ झाले ती त्याच ठिकाणी उभी होती. रस्त्यावरून येणारे-जाणारे वाहनचालक केवळ तिच्याकडे पाहून मार्गस्थ होत होते. आत्महत्या करण्याच्या हेतूने ती युवती त्या ठिकाणी उभी असावी, अशी शंका दुचाकीवरून येणाऱ्या दोघा युवकांना आली. त्या युवकांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र तिच्या आणखी हालचाली वाढल्याने ते युवक तेथून काहीअंतरावर पुढे उभे राहिले. त्या युवकांना पाहून इतर वाहनचालकही थांबले. त्या युवतीला पुलावरून परत आणण्याचा त्या युवकांनी बेत आखला होता. मात्र, तोपर्यंत कोरेगाव बाजूकडून गस्त घालत पोलिसांची गाडी संगममाहुली पुलावर आली. त्या युवतीला पाहातच पोलिसांनीही गाडीची लाईट लावली. अन् क्षणातच गाडी पुलावर थांबली. गाडीतून महिला पोलीस आणि एक पोलीस कर्मचारी उतरले. त्यांनी त्या युवतीला कठड्यावरून खाली उतरून गाडीजवळ नेले. काहीवेळ पोलिसांनी तिच्याशी चर्चा केली. त्यानंतर तिला पोलीस व्हॅनमधून ठाण्यात नेण्यात आले. ती युवती तेथे कुठून आली. कोणत्या महाविद्यालयात शिकते. पुलाच्या कठड्यावर उभे राहण्याचा तिचा हेतू काय, यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत पोलीस त्या युवतीची चौकशी करत होते. त्या ठिकाणाहून अनेकांनी केल्यात आत्महत्या ! संबंधित युवती ज्या ठिकाणी पुलावर उभी होती, त्याच ठिकाणाहून अनेकांनी उडी मारून आत्महत्या केल्या आहेत. असे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. संबंधित युवतीही त्याच उद्देशाने तेथे घुटमळत होती. परंतु पोलीस आल्याने तिचे प्राण वाचले, अशी चर्चा घटनास्थळी होती. (प्रतिनिधी)