ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांची हेल्पलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST2021-03-04T04:50:19+5:302021-03-04T04:50:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करत त्यांना संरक्षण देण्यासाठी आता ‘१०९१’ ही हेल्पलाईन फायद्याची ...

Police helpline to help senior citizens | ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांची हेल्पलाईन

ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांची हेल्पलाईन

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करत त्यांना संरक्षण देण्यासाठी आता ‘१०९१’ ही हेल्पलाईन फायद्याची ठरणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत बैठका घेऊन समुदेशनाचे कामास प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समस्यांसाठी ज्येेष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले.

पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यात ज्येेष्ठ नागरिक सेल स्थापन करण्यात आला आहे. त्यात २५ पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार यांच्यासह १६ सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आहेत. ज्येष्ठांच्या समस्या निराकरणासाठी १०९१ हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे तसेच त्यांचे २५ व्हॉटस ॲपचेही ग्रुप करण्यात आले आहेत.

या आठवड्यात सर्व ठिकाणी बैठका घेत ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात आला.

चौकट

ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी २४ तास पोलिसांचे सहकार्य असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाणे व टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक गेडाम यांनी केले.

Web Title: Police helpline to help senior citizens