शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
2
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
3
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
4
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
5
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
6
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
7
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
8
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
9
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
10
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
11
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
12
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
13
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
14
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
15
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
16
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
19
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
20
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ‘अलर्ट’; ‘धूम’ टोळी गायब!

By admin | Updated: November 28, 2014 23:49 IST

सांगलीत नाकाबंदी : ९४८ दुचाकींवर कारवाई

सांगली : गेल्या महिन्यांपासून ‘धूम’ टोळीने शहरात धुमाकूळ घालून बँकेतून रोकड काढून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना लुटण्याचा उद्योग सुरु केल्याने त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची दररोज नाकाबंदी सुरु आहे. शहरातील काही प्रमुख बँकांबाहेर नाकाबंदी करुन संशयित वाहनधारकांची धरपकड केली जात आहे. गेल्या आठ दिवसात सुमारे ९४८ दुचाकींवर कारवाई करुन एक लाख दोन हजार सातशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुष्पराज चौक, जिल्हा परिषद, कर्नाळ पोलीस चौकी या तीन ठिकाणी बँकेतून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना ‘धूम’ टोळीने लुटले. भरदिवसा या घटना घडल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली. या घटना रोखण्यासाठी व टोळीतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शहरातील गस्त वाढविली. पुष्पराज चौक, आमराई रस्ता, कर्नाळ पोलीस चौकी मार्ग यासह शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर पडणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या आठ दिवसांपासून दररोज सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत नाकाबंदी केली जात आहे.
‘धूम’ टोळी चार ते पाच जणांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. ते ग्राहकांवर ‘वॉच’ ठेवून त्यांना लुटत आहेत. आतापर्यंत त्यांनी १३ लाखांची रक्कम लुटली आहे. घटनेनंतर ते दुचाकीवरुन पसार होतात. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी गुन्ह्याचे तंत्र बदलले असले तरी, ही टोळी एकच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नाकाबंदीत विशेषत: दुचाकी अडवून चौकशी केली जात आहे. वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नसेल, तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शस्त्रधारी पोलिसांचा पहारा तैनात केला आहे. (प्रतिनिधी)

धागेदोरे हाती : सावंत
पोलीसप्रमुख सावंत म्हणाले, ‘धूम’ टोळी बाहेरील जिल्ह्यातील आहे. त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये निश्चित यश येईल. महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. बँका व ग्राहकांनीही सतर्कता बाळगायला हवी.