शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

गावांच्या विकासासाठी लोकसहभाग गरजेचा

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

शिवाजीराव नाईक : कोंडाईवाडीतील उपक्रम विकासाला चालना देणारा

कोकरूड : लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व ग्रामस्थांना एकत्रित करुन जनता दरबार घेऊन कोंडाईवाडीतील युवकांनी विकासाला चालना देणारा कार्यक्रम घेऊन आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांनी केले. कोंडाईवाडी (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायत व माऊली जिजाऊ प्रतिष्ठानच्यावतीने घेतलेल्या जनता दरबारमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी आ. मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख उपस्थित होते.आ. नाईक म्हणाले, गावाच्या विकासासाठी लोकसहभाग व प्रशासन यांची सांगड घालून काम केल्याने गावाचा चेहरामोहरा बदललेला दिसून येईल. कोंडाईवाडीतील मुंबईकर बांधवांची गावासाठी असणारी तळमळ ही निश्चितच प्रेरणादायी आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे तालुक्यातील तलाव अपूर्ण भरल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. शिराळा व वाळवा तालुका ‘जलयुक्त शिवार’मध्ये येत नव्हते. परंतु सरकारशी विचारविनियम करुन शिराळा तालुक्यातील ४५ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. थोड्याच दिवसात त्याची अंमलबजावणी शासनाकडून होईल. पुढील वर्षापासून जलयुक्त शिवारमधून कामे मार्गी लागणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. माजी आ. मानसिंगराव नाईक यांनी, कोंडाईवाडीतील विकासासाठी घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे. याचा इतर गावे निश्चित आदर्श घेतील. गावातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत पाणी मिळण्यासाठी कृषी विभागाने जलयुक्त शिवार किंवा पाणलोट विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.सत्यजित देशमुख म्हणाले, उत्तर भागातील ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार अभियानामधून कामे करून घेण्यासाठी पुढे आले, तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहिलेली दिसेल. गावातील सर्वच विकासकामे शासन करेल असे नाही, परंतु जी कामे लोकसहभागातून होतील ती एकत्रित येऊन पूर्ण करावीत. यावेळी कृषी अधिकारी माने यांनी एकात्मिक पाणलोट कार्यक्रमामधून १० गावांना पंचायत समितीच्या माध्यमातून भात काढणी यंत्र वितरण केल्याचे सांगितले. यावेळी प्रकाश पाटील, के. डी. पाटील, सभापती चंद्रकांत पाटील, सरपंच मालनताई लाड, पं. स. सदस्या शारदा घारगे, उपसरपंच सुभाष कारंडे, बापू लाड, उत्तम पाटील, विष्णू सावंत, प्रकाश पवार, इब्राहीम मुलाणी, सुनील सावंत उपस्थित होते. (वार्ताहर)