शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पंडितजींच्या बासरीने सांगलीकरांना जिंकले...

By admin | Updated: September 13, 2015 22:22 IST

सांगलीत कार्यक्रम : शास्त्रीय गायन, वादनाने मैफिलीत रंग

सांगली : रसिकमनांना कवेत घेत अवीट गोडीच्या संगीताने घातलेली मोहिनी... अविस्मरणीय क्षणांना मनात खोलवर साठविण्यासाठी आतुर झालेली मने... अशा सुंदर वातावरणात पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीच्या स्वररंध्रांमधून झालेला स्वराविष्कार हृदयाला साद घालीत तल्लीन होऊन सांगलीकरांवर मनसोक्त बरसला.संगीताचार्य द. वि. काणेबुबा प्रतिष्ठानच्या गुरूकुलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीत रविवारी विशेष मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीत पंडित हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरांनी हजारो रसिकांनी खचाखच भरलेले भावे नाट्यगृह न्हाऊन निघाले. त्यांनी बासरीवादनाची सुरुवात मत्त तालातील राग मारुबिहागने केली. त्यांनी तीन तालातील भूप रागात बंदिशी सादर केली. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पंडित विजय घाटे यांनी तबलासाथ, तर सुनील अवचट यांनी बासरीसाथ दिली. पंडित हरिप्रसाद चौरासिया व विजय घाटे यांच्यात झालेल्या जुगलबंदीने रसिक तृप्त झाले. याआधीच्या सत्रामध्ये पंडित उल्हास कशाळकर यांचे गायन झाले. त्यांनी मैफिलीची सांगता ठुमरीने केली. त्यांना पंडित सुरेश तळवळकर यांनी तबलासाथ, तर श्रीराम हबसनीस यांनी संवादिनीसाथ दिली. कशाळकर यांनी गायनाची सुरूवात मुलतानी रागाने केली. ‘कवन देस’ झुमरा तालात गायिले. त्यानंतर गौड मल्हार राग गायिला. सुरुवातीला जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते झेंडे महाराज, उद्योगपती विजय पुसाळकर, काकासाहेब चितळे, गणेश गाडगीळ यांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन झाले. गुरुकुलच्या विश्वस्त मंजुषा पाटील यांनी स्वागत केले. गुरुकुलवरील माहितीपत्राचे सादरीकरणही झाले. याविषयी डॉ. विकास कशाळकर यांनी माहिती दिली. विनिता तेलंग यांनी सूचसंचालन केले, तर डॉ. बाळकृष्ण चैतन्य यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)