शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

पलूस-कडेगावची विभागणी ‘घाटमाथ्या’वरून

By admin | Updated: September 17, 2014 23:03 IST

पलूस-कडेगावची विभागणी ‘घाटमाथ्या’वरून

प्रताप महाडिक - कडेगाव -कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा व सध्या ताकारी व टेंभू योजनांच्या माध्यमातून सधन झालेला कडेगाव तालुका तसेच कृष्णाकाठचा पलूस तालुका अशा दोन तालुक्यांचा समावेश असलेला कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघ आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे पूर्वीचे नाव भिलवडी-वांगी असे होते. १९७८ च्या निवडणुकीपूर्वी खानापूर तालुक्यातील काही गावे आणि तासगाव तालुक्यातील काही गावे मिळून भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघाला ९ निवडणुकांचा इतिहास आहे. यापैकी १९७८ आणि १९८० अशा दोन निवडणुकात पलूस तालुक्यातील संपतराव चव्हाण यांना आमदारकी मिळाली, तर १९९५ च्या निवडणुकीत कडेगाव तालुक्यातील संपतराव देशमुख यांना आणि १९९६ च्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांना आमदारकी मिळाली. उर्वरित १९८५, १९९०, १९९९, २००४ आणि २००९ अशा तब्बल पाच निवडणुका जिंकून कडेगाव तालुक्यातील डॉ. पतंगराव कदम यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.२००९ च्या पुनर्रचनेत पलूस तालुक्यातील आंधळी, मोराळे आणि बांबवडे या तीन गावांचा समावेश या मतदारसंघात झाला. अन्य सर्व गावे जुन्या भिलवडी-वांगी मतदारसंघातीलच आहेत. कायम दुष्काळी कडेगाव तालुक्यातील शेतकरी मुरमाड व कोरडवाहू शेतजमिनीत काबाडकष्ट करून वाटचाल करीत होते. याशिवाय वसगडे, भिलवडी परिसरात क्षारपड जमिनीचा प्रश्न आहे. अशा भौगोलिक परिस्थितीशी झुंज देणारा हा मतदार राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानला जातो.भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर पहिली निवडणूक झाली, ती १९७८ मध्ये काँग्रेसचे संपतराव चव्हाण आणि शेकापचे क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड यांच्यात ही निवडणूक झाली. या निवडणुकीत चव्हाण यांनी लाड यांचा २२ हजार ३२२ मताधिक्याने पराभव केला. ही निवडणूक वगळली, तर या मतदारसंघातील सर्व आठही निवडणुका कदम यांनी लढविल्या आहेत. पाच निवडणुकांमध्ये पतंगरावांचा विजय झाला, तर तीन निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. १९८० च्या निवडणुकीत पतंगरावांनी बंडखोरी केली. पण, केवळ ८६ मतांनी त्यांचा पराभव झाला. १९८५ च्या निवडणुकीत कदम यांचा ३० हजार १३५ मतांनी विजय झाला. १९९५ च्या निवडणुकीत अपक्ष संपतराव देशमुख यांनी कदम यांचा ७ हजार २६५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीचा अपवाद वगळता आजपर्यंत कदम यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे.आरोप-प्रत्यारोपांच्या फै री झडणारआगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पतंगराव कदम व महायुतीच्या वाटेवर असलेले पृथ्वीराज देशमुख यांच्यातच कडवा राजकीय सत्तासंघर्ष पहावयास मिळणार आहे. यामुळे या निवडणुकीत आरोप-प्रत्योपांच्या फै री झडणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबाही इच्छुक आहेत. कडेगाव तालुक्यात एक लाख २५ हजार ४४८, तर पलूस तालुक्यात एक लाख २६ हजार २१२, असे एकूण दोन लाख ५१ हजार ६०७ मतदार कडेगाव-पलूस तालुक्याचा आमदार ठरविणार आहेत. दोन्ही तालुक्यात समान मतदान असल्यामुळे प्रचाराचा जोरही दोन्हीकडे समांतर असणार आहे.