शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात ९३ हजारावर मुलींची सुकन्या खाती, पोस्टाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला दहा वर्षे पूर्ण

By अविनाश कोळी | Updated: January 23, 2025 16:04 IST

लाडक्या लेकीच्या भविष्यासाठी

अविनाश कोळीसांगली : मुलीच्या भवितव्याची चिंता नेहमीच पालकांना सतावत असते. मात्र, पोस्टाने पालकांना चिंतामुक्त करणारी ‘सुकन्या’ योजना आणल्यानंतर पालकांनी या योजनेत मोठी गुंतवणूक केली. योजनेला बुधवारी दहा वर्षे पूर्ण झाली असून जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कालावधीत एकूण ९३ हजार २३५ मुलींची खाती काढण्यात आली आहेत.तुम्हीही मुलीचे वडील असाल आणि तुमच्या लेकीने भविष्यात आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावे, अशी तुमची इच्छा असेल, तिला कधीही पैशाची अडचण येऊ नये, असे वाटत असेल तर तुम्हीही सरकारची या महत्त्वाकांक्षी योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत गुंतवणूक केली तर तुमची मुलगी २१ वर्षात करोडपती होईल. तुम्हाला या योजनेत जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त या विशेष योजनेसाठी दररोज ४१६ रुपये वाचवावे लागतील.दररोज ४१६ रुपयांची ही बचत नंतर तुमच्या मुलीसाठी ६५ लाख रुपयांची मोठी रक्कम मिळवून देईल. सुकन्या समृद्धी योजना ही अशी दीर्घकालीन योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणाबद्दल आणि भविष्याबद्दल खात्री बाळगू शकता.

..अशी आहे सुकन्या समृद्धी योजनाया योजनेची मॅच्युरिटी २१ वर्षांनंतर आहे. मात्र, यामध्ये पालकांना फक्त १५ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. उर्वरित वर्षभर व्याज चक्रवाढ होत राहते. या योजनेत वर्षाला जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. तसेच तुम्ही २५० रुपयांत खाते उघडू शकता.

लाडक्या लेकीच्या भविष्यासाठीही योजना खास तुमच्या लाडक्या मुलीसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेत तुम्ही अल्प रकमेमध्ये खाते उघडून तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे थोडे थोडे पैसे जमा करु शकता.मुलगी १० वर्षांची होण्याआधी काढावे लागते खातेशून्य ते १० वर्षे वयाच्या मुलीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ‘सुकन्या’ खाते उघडता येते. किमान १ हजार रुपये ठेवावे लागतात. १ वर्षात खात्यात कमाल १.५ लाख टाकता येतात.

खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी मुलीच्या लग्नासाठी किंवा १८ व्या वर्षी शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढता येते. यास ७.६ टक्के व्याजदर आहे. महत्त्वाकांक्षी योजनेला दहा वर्षे पूर्ण झाली असून जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पालकांनी त्यांच्या कन्येच्या भवितव्यासाठी हे खाते उघडावे. अधिक माहितीसाठी पालकांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयास संपर्क साधावा. - रमेश पाटील, प्रवर डाक अधीक्षक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीPost Officeपोस्ट ऑफिस