शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

गुंड म्हमद्या नदाफ जिल्ह्याबाहेर पसार

By admin | Updated: November 22, 2015 00:04 IST

पोलिसांची माहिती : दहा पथके रवाना; सांगली शहरात नाकाबंदी

सांगली : येथील संजयनगरमधील गोरखनाथ ऊर्फ मनोज माने याचा खून करणारा गुंड म्हमद्या नदाफ हा कारवाईच्या भीतीने जिल्हाबाहेर पसार झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. तो कुठे आश्रयाला जाऊ शकतो, याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. त्याच्या शोधासाठी असलेला शंभर पोलिसांचा ताफाही जिल्ह्याबाहेर रवाना केला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. म्हमद्याच्या मालमत्तेवर ‘टाच’ आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, असेही त्यांनी सांगितले. आर्थिक वाद व खंडणीचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने म्हमद्या नदाफ व त्याच्या साथीदारांनी मनोज मानेचा धारदार शस्त्रांनी हल्ला करुन खून केला होता. या घटनेला दहा दिवसांचा कालावधी होऊन गेला तरी म्हमद्या पोलिसांच्या हाताला लागला नाही. त्याला मदत करणाऱ्यांच्या नाड्या आवळल्यानंतर तो कदाचित शरण येईल, अशी पोलिसांना अपेक्षा होती. पण पोलीस आपले ‘एन्काऊंटर’ करतील, अशी त्याला भीती असल्याने तो फरारीच राहिला आहे. आई व भावाला तो भेटून गेल्याने पोलिसांनी गेल्या आठ दिवसात संजयनगर, अभयनगर, चैतन्यनगर, शिंदे मळा, हनुमाननगर, शंभरफुटी, कुपवाड या परिसरात ‘कोम्बिंग आॅपरेशन’ मोहीम राबविली. म्हमद्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. हाती काहीच लागले नाही. म्हमद्या शहर व जिल्ह्यातून पसार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याच्या शोधासाठी असलेले शंभरहून अधिक पोलीस जिल्ह्याबाहेर रवाना करण्यात आले आहेत. दोन दिवसापूर्वी तो हुबळीत आश्रयाला असल्याची माहिती मिळाल्याने पथक तातडीने रवाना केले होते. परंतु काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे पथक शुक्रवारी पहाटे हात हलवित परतले. (प्रतिनिधी) पाच ताब्यात : ‘रेडलाईट’मध्ये तपासणी शुक्रवारी रात्री पोलिसांनी काळ्या खणीजवळील प्रेमनगर येथील रेडलाईट परिसरात नाकाबंदी केली होती. रात्री आठ ते बारा या वेळेत नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पाचजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पण त्यांचा म्हमद्या नदाफ प्रकरणाची काहीही संबंध नाही. गोकुळनगर परिसरातही नाकाबंदीचे नियोजन होते. मात्र तिथे म्हमद्याच्या विरोधातील टोळीचे वास्तव्य असते. त्यामुळे म्हमद्या तिथे जाण्याचे धाडस करणार नाही, असा विचार करुन पोलिसांनी तिथे नाकाबंदी केली नाही.