शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

आमचीच शिवसेना ओरिजनल; शंभूराज देसाईंचे ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर

By प्रमोद सुकरे | Published: January 23, 2024 9:18 PM

शिवसेना फुटलेली नाही, ओरिजनल शिवसेना कायद्याने घटनेने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने आमची शिवसेना खरी असल्याचे सांगितले आहे.

कराड- आम्ही शिवसेना पळवली नाही, शिवसेना फुटली नाही. उलट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वांच्या विचारांशी प्रतारणा कोणी यांचा विचार करावा. असा उपरोधिक सल्ला ठाकरेंना मंत्री शंभूराज देसाईंनी दिला .तर आमचीच शिवसेना ओरीजनल असल्याचे सांगितले.कराड येथील उपजिल्हा रूग्णालयातील सी टी स्कॅन मशिनच्या लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री शंभूराज देसाई आले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 

देसाई म्हणाले, शिवसेना फुटलेली नाही, ओरिजनल शिवसेना कायद्याने घटनेने आणि ज्यांना शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार आहे त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आमची शिवसेना खरी असल्याचे सांगितले आहे. उबाठा गटाची मंडळी कोर्टात गेली, कोर्टानेही त्याचे ऐकले नाही. राज्य न्यायाने, घटनेने आणि कायद्याने चालते. आम्ही कायद्याच्या चाैकटीत राहून योग्य निर्णय घेतलेला आहे.

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारपासून सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी अडीच वर्ष बाजूला गेले. बाळासाहेबांचे जे काॅंग्रेस बाबतचे विचार होते, त्याच्या उलट कृती उबाठा गटाने केली. सत्तेसाठी ज्याच्या विरोधात लढले त्याच्या सोबत सत्तेत जावून बसले. त्यामुळे शिवसेनेच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिदुत्वाच्या विचारांशी कोणी प्रतारणा केली आहे, याचं आत्मपरीक्षण ठाकरे गटाने करावं असा उपरोधिक सल्ला शंभूराज देसाईंनी दिला आहे.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv Senaशिवसेना