शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना हद्दपार करण्याचा डाव

By admin | Updated: September 13, 2015 22:35 IST

इस्लामपुरातील राजकारण : विरोधकांचे दर्शन झाले दुर्मिळ; अनेकजण नामधारी विरोधक

अशोक पाटील - इस्लामपूर --इस्लामपूर पालिकेतील सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा डाव पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे आणि खंडेराव जाधव यांनी आखला होता, परंतु तो फसला. तसेच विरोधी गटातील नगरसेवक आनंदराव पवार, कपिल ओसवाल हे पालिका कार्यक्षेत्रात भेटणे दुर्मिळ झाले आहेत. काही वेळा सत्ताधाऱ्यांतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील, उपनगराध्यक्ष संजय कोरे हे सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवितात.शहरात होत असलेल्या निकृष्ट विकास कामांवर थेट जाऊन ही कामे बंद पाडण्यासाठी माजी नगरसेवक वैभव पवार व त्यांचे बंधू विजय पवार आक्रमक झाले आहेत. त्यांची ही भूमिका सत्ताधारी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी बनली आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनातील बेकायदेशीर कामकाजावर आक्षेप घेऊन तक्रारी करण्यात विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी आघाडी घेतली आहे. कुंभार यांना सत्ताधाऱ्यांतीलच काही नगरसेवक मार्गदर्शन करीत असल्याची चर्चा राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. यावर रामबाण उपाय म्हणून विजय पाटील, डांगे गटाचे अ‍ॅड. चिमण डांगे आणि एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव यांनी सभागृहात काही गोष्टींवर आक्षेप घेऊन, विजय कुंभार यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा राजकीय डाव आखला असल्याची चर्चा आहे.पालिकेच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांविरोधात विजय कुंभार हे एकाकी लढताना दिसतात. त्यांना ताकद देण्यासाठी विरोधी नगरसेवक आनंदराव पवार, कपिल ओसवाल सभागृहात उपस्थित नसतात. याचाच फायदा सत्ताधारी नगरसेवक उठवत आहेत. आनंदराव पवार यांच्यावर जिल्हा पातळीवरील शिवसेनेची जबाबदारी आहे. त्यामुळे ते प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध नसतात. तसेच दुसरे विरोधी नगरसेवक कपिल ओसवाल हे पेठनाक्यावरील महाडिक पिता—पुत्रांच्या ताकदीवर बिल्डर व्यवसायात जम बसवत राजकारणाला फाटा देत असल्याचे चित्र आहे.एकंदरीत शहरातील सत्ताधाऱ्यांची ताकद वाढत असून विरोधी नगरसेवक आणि भाजपचे विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी यांच्यामध्ये पायपोस राहिलेला नाही. त्यामुळेच पालिका सभागृहातून विरोधी पक्षालाच हद्दपार करण्याचे धोरण राष्ट्रवादीने आखले असल्याचे बोलले जात आहे.बाबासाहेब सूर्यवंशी यांच्याबद्दल तर्क-वितर्कपालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्येच ३ गट आहेत. पालिका प्रशासनात काम करताना या तीनही गटांचे नेते दिवसा एकत्र येण्याचे नाट्य करतात, तर रात्री एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे डाव आखतात. त्यामुळे या तिन्ही गटनेत्यांच्या भूमिकेबाबत सर्वसामान्यांतून शंका उपस्थित होत आहे.एकेकाळी सत्ताधारी राष्ट्रवादीला धारेवर धरणाऱ्या बाबासाहेब सूर्यवंशी यांच्या तलवारीची धार आता बोथट झाली आहे. महिलांसाठी निर्माण केलेल्या गृहनिर्माण संस्थेचीही वाट लागली आहे. सध्या ते अज्ञातवासात असल्याने त्यांच्याबद्दल अनेक तर्क—वितर्क लढविले जात आहेत.बाबासाहेब सूर्यवंशी यांच्याबद्दल तर्क-वितर्कपालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्येच ३ गट आहेत. पालिका प्रशासनात काम करताना या तीनही गटांचे नेते दिवसा एकत्र येण्याचे नाट्य करतात, तर रात्री एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे डाव आखतात. त्यामुळे या तिन्ही गटनेत्यांच्या भूमिकेबाबत सर्वसामान्यांतून शंका उपस्थित होत आहे.एकेकाळी सत्ताधारी राष्ट्रवादीला धारेवर धरणाऱ्या बाबासाहेब सूर्यवंशी यांच्या तलवारीची धार आता बोथट झाली आहे. महिलांसाठी निर्माण केलेल्या गृहनिर्माण संस्थेचीही वाट लागली आहे. सध्या ते अज्ञातवासात असल्याने त्यांच्याबद्दल अनेक तर्क—वितर्क लढविले जात आहेत.