शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टीनंतर आता पाणीपट्टीचा झटका

By admin | Updated: August 18, 2015 00:37 IST

महापालिकेकडून खासगीकरणाचा घाट : दरवर्षी १ कोटी २६ लाख ठेकेदाराला मिळणार

सांगली : भांडवली मूल्यावरील घरपट्टीचा शॉक लागतो न लागतो तोच आता खासगीकरणामुळे पाणीपट्टी वाढीचा झटका नागरिकांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका ठेकेदाराला दरवर्षी १ कोटी २६ लाख रुपये देणार असून, पाणीपुरवठा विभागाचे उत्पन्न वाढले तर त्यापोटी कमिशनही ठेकेदाराला दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या डोक्यावर कराचा बोजा वाढणार आहे. महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या खासगीकरणाचा प्रस्ताव गत स्थायी समिती सभेत विषयपत्रिकेवर घेण्यात आला होता. या प्रस्तावाला घाईगडबडीत मंजुरी देण्यात आली. पुण्यातील मे. क्रेन्टबेरी एन एक्स सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला हा ठेका देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे प्रशासकीय टिपणीत म्हटले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या बहुतांश कामांचा समावेश केला आहे. ही सर्व कामे ठेकेदाराला सोपविण्याचे सुचविण्यात आले आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील सर्व कनेक्शन्सचे रिडिंग घेणे, छायाचित्र बिल स्वरूपाची पाणीपट्टी बिले तयार करणे, बिलांचे वाटप करणे, अनधिकृत कनेक्शन्सचा सर्व्हे करणे, सर्व कनेक्शन्सना चालू स्थितीतील मीटर बसविणे, तक्रारींचे निराकरण करणे, कनेक्शन्स व वसुलीबाबतचा अहवाल तयार करणे, थकबाकी वाढलेल्या ग्राहकांच्या बिलांबाबत ठोस निर्णय घेऊन वसुली करणे आदी कामांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात सध्या ६७ हजार २०० घरगुती, तर २ हजार ५०० बिगर घरगुती कनेक्शन्स् आहेत. महापालिकेच्या संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेचे २००९-१० या वर्षी नागपूर येथील मा. दिनेश राठी अ‍ॅण्ड असोसिएटस् या खासगी सल्लागारांमार्फत वॉटर आॅडिट करण्यात आले होते. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे अनेक त्रुटी या विभागात असल्याचे मत सल्लागार कंपनीने व्यक्त केले होते. महापालिकेला वर्षाकाठी सरासरी १४ ते १५ कोटी मिळत आहेत. मागणीच्या तुलनेत रक्कम कमी असल्याने खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. (प्रतिनिधी)