शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

आता आला नवरात्रोत्सव, धास्तावले सारे इच्छुक!

By admin | Updated: September 18, 2014 23:25 IST

मंडळांना पर्वणी : मंडळे तीच, अध्यक्ष मात्र बदलले

दिलीप मोहिते -- विटा -खानापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचा फिव्हर वाढला असून, इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे; मात्र गावोगावचे सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे आता इच्छुकांची डोकेदुखी ठरत आहेत. गणेशोत्सव काळात मंडळांनी भावी इच्छुकांकडून हात धुऊन घेतला. अनेक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी, बेन्जो, शेडसाठी पत्रे, यासह बरेच साहित्य पदरात पाडून घेतले. आता नवरात्रोत्सव सुरू होत असून, त्याच गणेश मंडळांचे रूपांतर नवरात्रोत्सव मंडळात झाल्याने इच्छुक चांगलेच धास्तावले आहेत.येथे इच्छुकांनी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी केली आहे. गणेशोत्सवात युवकांनी गल्ली-बोळात स्थापना मंडळांची करून इच्छुकांना गणेशाच्या आरतीसाठी निमंत्रित केले. त्यापूर्वी या मंडळांनी इच्छुकांना गाठून मंडळासाठी डॉल्बी, बॅन्जो, शेडसाठी पत्रे, विद्युत रोषणाई, महाप्रसाद यासह अन्य खर्च इच्छुकांच्या माथी मारला. आता २५ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे आचारसंहिता असली, तरी नवरात्रोत्सवही धडाक्यात साजरा करण्याचा निर्णय युवकांनी घेतला आहे. परिणामी, गेल्या महिन्यातील गणेशोत्सव मंडळांचेच रूपांतर आता नवरात्रोत्सव मंडळांत झाले आहे. युवक तेच असून, केवळ मंडळांचे अध्यक्ष बदलले आहेत. त्यामुळे नवे अध्यक्ष व त्यांचे कार्यकर्ते इच्छुकांच्या मागे लागले आहेत. गणेशोत्सव मंडळांना भरीव ओवाळणी दिल्यानंतर आता इच्छुकांसमोर नवरात्रोत्सव उभा ठाकला आहे. या उत्सवात युवकांना खूश ठेवण्यासाठी पुन्हा एकदा खिसा रिकामा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील इच्छुक धास्तावले आहेत. यंदा मंडळांसाठी विधानसभा निवडणूक पर्वणी ठरणार आहे. खानापूर मतदारसंघातील खानापूर व आटपाडी या दोन तालुक्यांसह तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलच्या २१ गावांतही आता नवरात्रोत्सव मंडळे मूळ धरू लागली आहेत. मंडळातील युवकांचे शक्तिप्रदर्शन करून मंडळांसाठी साहित्य पदरात पाडून घेण्याचा प्रकार आता सुरू झाला आहे. या तरुण मंडळांची नाराजी परवडणार नसल्याने बहुसंख्य इच्छुक खिशात हात घालू लागले आहेत.