शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट बियाणेप्रकरणी तीन कंपन्यांना नोटिसा

By admin | Updated: July 16, 2015 23:29 IST

जिल्हा परिषद : कृषी समिती बैठकीत अधिकाऱ्यांवर सदस्यांचा हल्लाबोल

सांगली : आटपाडी व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात आलेले कापसाचे बियाणे निकृष्ट असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीही याकडे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दुर्लक्ष केल्यावरून सदस्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. कार्यालयात बसून अहवाल न करता शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची सूचनाही सदस्यांनी अधिकाऱ्यांना केली. याप्रकरणी संबंधित तीन कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, यासाठी नोटिसा बजाविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेत शुक्रवारी घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मनीषा पाटील होत्या. आटपाडी तालुक्यातील ७००, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील ७० शेतकऱ्यांना कापसाचे बियाणे पुरविण्यात आले होते. हे बियाणे निकृष्ट असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या बियाणांचे नमुने राहुरी कृषी विद्यापीठाकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून बियाणांची उत्पादन क्षमता कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कृषी समिती बैठकीत सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. कृषीधन (सुपर फायबर बियाणे), ग्रीन गोल्ड (कविता गोल्ड), तर वर्धा येथील दफ्तरी सीड या बियाणांच्या कंपन्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश सभापती मनीषा पाटील यांनी दिले. या कंपन्यांनी निकृष्ट बियाणे दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांकडून तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असेही आदेश यावेळी देण्यात आले. जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यावरही सभेत चर्चा झाली. जिल्ह्यातील तीन लाख ९२ हजार हेक्टरपैकी २ लाख ६७ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शासनाने या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, असा ठराव करण्यात आला. (प्रतिनिधी)ग्रामसेवकांना नोटिसाइको व्हिलेजअंतर्गत प्रचारसाहित्य खरेदीप्रकरणी वाळवा तालुक्यातील ६४ ग्रामसेवकांना नोटिसा बजाविल्या आहेत. इको व्हिलेज अभियानात फलक खरेदी करण्यात आली होती. त्यात ४ लाख ७८ हजार रुपयांची अनियमितता होती. याप्रकरणी पूर्वी ग्रामसेवकांना नोटिसा बजाविल्या होत्या. आता विभागीय चौकशी का करू नये?, अशी नोटीस बजाविली आहे.