शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

अट्टाहास वर्चस्वाचा नव्हे, विकासाचा हवा

By admin | Updated: November 23, 2015 00:32 IST

तासगाव तालुक्यात नेत्यांकडून अपेक्षा : जनतेला हवेत आमदार आणि खासदारही

दत्ता पाटील- तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील वर्चस्ववादाचे कवित्व भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून संपलेले नाही. मात्र तालुक्यातील जनतेचा खरा कौलच नेत्यांना समजला नाही की काय? असाच प्रश्न चढाओढीच्या राजकारणाने उपस्थित झाला आहे. तालुक्याला विधानसभेसोबतच लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची पहिल्यांदा संधी मिळालेली आहे. आमदार सुमनताई पाटील आणि खासदार संजयकाका पाटील या दोन्ही नेत्यांनी वर्चस्वाच्या अट्टाहासाऐवजी विकास कामांचा अट्टाहास धरावा, अशीच जनतेची अपेक्षा आहे.तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यावेळी गावपातळीवर गाजण्याऐवजी तालुका पातळीवरच जास्त चर्चेत आल्या. भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या, तालुक्यावर वर्चस्व मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. सरपंच निवडीनंतरही वर्चस्ववादाचे राजकारण रंगतच राहिले. वर्चस्वाच्या अट्टाहासापोटी निवडून आलेल्या कारभाऱ्यांना आपल्याच पक्षाच्या व्यासपीठावर आणण्यासाठीही दोन्ही नेत्यांकडून जोराचे प्रयत्न झाले. अगदी सरपंचांना घेऊन फोटोसेशन आणि नंतर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पुन्हा वर्चस्वाची डरकाळी फोडण्यात आली. मात्र हे करताना विजयी उमेदवारांची अपेक्षा, उमेदवारांना विजयी करणाऱ्या जनतेच्या अपेक्षांची कोठेच दखल घेण्यात आली नाही. गावपातळीवर विजय मिळविलेल्या कारभाऱ्यांचे पुढील पाच वर्षातील विकासाचे व्हिजन काय आहे, याची साधी चर्चाही कोठे झाली नाही. हा याचा अन् तो त्याचा, एवढीच चर्चा झाली.यावेळच्या निवडणुकीत वर्चस्व कोणाचेही असले तरी, तब्बल १६ गावांतील विद्यमान कारभाऱ्यांना जनतेने नाकारले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीसह भाजपच्याही ग्रामपंचायतींचा समावेश होता. जनतेला एकाच नेत्याचे वर्चस्व हवे असते, तर दोन्ही नेत्यांसाठी बालेकिल्ला असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले नसते. जनतेला विकास हवा आहे. नव्या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आव्हान आहे. तालुक्यातच आमदार आणि तालुक्यातीलच खासदार असल्यामुळे दोन्ही नेत्यांकडून विकासासाठी मोठा निधी येईल, अशी जनतेला अपेक्षा आहे. दोन्ही नेत्यांनी विकासासाठी ईर्षा करावी. खासदार आणि आमदारांनी गटबाजीचा अट्टाहास करण्याऐवजी विकासाचा अट्टाहास करावा, एवढी साधी अपेक्षा जनतेची आहे. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेते आग्रह धरणार, की गटबाजीचे राजकारण करीत राहणार, हे काळच ठरवले.आम्हीच का निष्ठा ठेवायची?तालुक्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादीत जोराचा संघर्ष सुरु आहे. दोन्ही गटात अभेद्य भिंंत तयार झाली आहे. मात्र दोन्हीकडे समान अंतर ठेवून राहणाराही एक गट आहे. अशा भिंंतीवर असणाऱ्या कारभाऱ्यांना खेचण्यासाठी दबाव येत आहे. तरीदेखील दोन्ही नेत्यांनी दावा केलेल्या बहुतांश गावांतील सदस्यांनी नरोवा कुंजरोवाची भूमिका घेतली. काही वर्षापूर्वी आबा आणि काका एक झाले होते. आम्ही एकाच नेत्याच्या मागे का राहायचे? असा प्रश्नच काही सरपंचांनी उपस्थित केला. विकासासाठी आम्हाला दोन्ही नेते हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.जनता वेठीस कशासाठी? लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने संजयकाका पाटील यांना उच्चांकी मतदान केले होते. विधानसभा निवडणुकीत आर. आर. पाटील यांनाही जनतेने उच्चांकी मतदान दिले होते. दोन्ही नेत्यांना उच्चांकी मताने विजयी करणारी जनता एकच आहे. जनतेची ही भावना नेत्यांना केव्हा समजणार? की स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरत राहणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.