शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक भाजपात

By admin | Updated: September 11, 2015 23:06 IST

तासगाव नगरपालिका : नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावासाठी पुन्हा हालचाल

तासगाव : तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या सुशिला साळुंखे, विजया जामदार, रजनी लंगडे या तीन नगरसेविकांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपकडून स्वबळावर हालचाल सुरु झाली आहे. मात्र अविश्वास ठराव मंजुरीसाठी चौदा मतांची मॅजिक फिगर आवश्यक आहे. ती मिळविण्यासाठी भाजप काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.तासगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या पाठबळावर काँग्रेसचा एकमेव नगराध्यक्ष संजय पवार यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. राष्ट्रवादीच्या एका नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत काँग्रेससह राष्ट्रवादीचे नऊ आणि भाजपचे अपक्षांसह नऊ, असे सम-समान संख्याबळ आहे. मात्र दोन महिन्यांपासून नगराध्यक्ष बदलाबाबत दोन्ही गटातील नगरसेवकांत हालचाल सुरु होती. मात्र कोणत्याही एक गटाकडे अविश्वास ठराव आणण्याइतपत मॅजिक फिगर नव्हती. त्यामुळे दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी एकत्रित येऊन नगराध्यक्ष बदलाचा निर्णयही झाला होता. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सबुरीचा सल्ला दिल्यामुळे हा निर्णय बारगळला. नेमका याचा फायदा घेत भाजपने राष्ट्रवादीतील नाराजांना गळ लावला. गुरुवारी रात्री उशिरा खासदार संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांची बैठक झाली. याचवेळी तीनही नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट केले. या नगरसेविकांच्या भाजप प्रवेशामुळे नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व झाले आहे. मात्र नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी आवश्यक असणारी १४ मतांची ‘मॅजिक फिगर’ गाठता आलेली नाही. (वार्ताहर)‘लोकमत’चा अचूक अंदाज  --‘भाजपकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गळ’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मधून २५ आॅगस्ट रोजी बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. राष्ट्रवादीतील नाराज नगरसेविकांना भाजपमध्ये घेऊन नगरपालिकेची सत्ता काबीज करणार असल्याबाबतचा अंदाज वर्तवला होता. नाराज असलेल्या नगरसेविकांची नावेदेखील प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाराजांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला होता. ‘लोकमत’ने अंदाज व्यक्त केलेल्या नगरसेविका सुशिला साळुंखे आणि विजया जामदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ‘लोकमत’चा अंदाज अचूक ठरला आहे, तर नगरसेविका रजनी लंगडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा भाजपकडून केला जात असला तरी, अजूनही त्यांची भूमिका तळ्यात-मळ्यात असल्याची चर्चा आहे.भाजपने अविश्वास ठराव आणण्यासाठी तयारी केली असली तरी, मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही. राष्ट्रवादीतील नगरसेवकांनी पक्ष सोडला असला तरी तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. - संजय पवार, नगराध्यक्षनगराध्यक्ष पदाची संधी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या सुशिला साळुंखे यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या टर्ममध्ये संधी देण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे, तर राष्ट्रवादीतील नेत्यांच्या दुटप्पी भुमिकेमुळे, तसेच अंतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणामुळेच कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती नगरसेविका सुशिला साळुंखे यांनी दिली. नगरसेविका लंगडेंची रजा रद्द राष्ट्रवादीच्या नगरसेविका रजनी लंगडे यांनी काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सहा महिन्यांची रजा मंजूर करुन घेतली होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सुरु झाली असतानाच, नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लंगडे यांनी रजा रद्द करण्याबाबत शुक्रवारी मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला.