शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची गळती थांबता थांबेना...

By admin | Updated: October 1, 2015 00:42 IST

कवठेमहांकाळची स्थिती : वैशाली पाटील, शिवाजीराव चंदनशिवेंचा पक्षाला अलविदा

कवठेमहांकाळ : राष्ट्रवादी नेते सुरेश पाटील, जि. प.चे बांधकाम सभापती गजानन कोठावळे आणि माजी सभापती सुरेखा कोळेकर यांच्या अहंकारीपणाला कंटाळून आपण खा. संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत, अशी माहिती पंचायत समितीच्या सभापती वैशाली पाटील व पं. स. सदस्य शिवाजीराव चंदनशिवे यांनी बुधवारी दिली. या दोघांच्या पक्षप्रवेशामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीची गळती थांबता थांबेना. आर. आर. पाटील यांचे निधन झाल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडायला प्रारंभ झाला. त्यांच्या निधनाला सहा महिने उलटताच पंचायत समितीचे दोन माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर व अनिल शिंदे, कवठेमहांकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हायूम सावनूरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी खा. संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाला काही दिवस उलटून गेले आणि लगेचच कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या सभापती वैशाली पाटील, सदस्य शिवाजीराव चंदनशिवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अलविदा केले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पंचायत समितीत कमळ फुलले आहे.वैशाली पाटील व चंदनशिवे म्हणाले की, सुरेश पाटील, गजानन कोठावळे आणि सुरेखा कोळेकर यांच्या धोरणाला कंटाळून आपण हा पक्ष सोडत आहोत. पंचायत समितीत विकास कामे करताना या मंडळींनी वारंवार हस्तक्षेप केला. त्यामुळे विकासाची कामे रखडली. मग अशा पक्षात राहून काय उपयोग? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खा. पाटील यांच्याशिवाय आता तासगाव, कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाला पर्याय नाही. म्हैसाळ व टेंभू पाणी योजना मार्गी लावण्याची शक्ती केवळ त्यांच्यातच असून, यापुढे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपमध्ये काम करणार आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)समीकरणे बदलली...वैशाली पाटील यांना राजीनामा देण्यासाठी दबावतंत्र वापरले गेले होते. राजीनामा द्या, अन्यथा अविश्वास ठराव दाखल करू, असा इशारा त्यांना दिला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमधील एका नेत्याशी हातमिळवणी करून पाटील यांच्यावर अविश्वास दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे वैशाली पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांच्यासह तीन सदस्य असल्यामुळे त्यांच्यावरील अविश्वास ठराव दाखल होणे अशक्यप्राय झाले आहे.