शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रशिक्षण केंद्राला जंगलाचे स्वरूप

By admin | Updated: March 25, 2015 00:03 IST

कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वणी तालुक्यातील निंबाळा येथील कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राची दुरवस्था झाली आहे.


तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज, मंगळवारी दाखल केला. यानिमित्त राष्ट्रवादीचे राज्यातील, जिल्ह्यातील नेते व आर. आर. पाटील समर्थकांनी शहरातून पदयात्रा काढली. अर्ज दाखल करतेवेळी विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज सुमनतार्इंचा अर्ज दाखल करण्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील बाजार समिती परिसरात गर्दी केली होती. प्रारंभी बाजार समितीमधील आर. आर. पाटील यांच्या कार्यालयातून सुमनताई पाटील यांनी पदयात्रा काढली. या पदयात्रेत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित, कन्या स्मिता यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पक्षाचे वरिष्ठ नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. तिथून मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात असणाऱ्या निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुमनताई पाटील यांच्यासह कार्यकर्ते रवाना झाले. (वार्ताहर)


सांगलीसह सातारा, सोलापूरचे इच्छुक
तासगाव-कवठेमहांकाळच्या पोटनिवडणुकीत सांगली जिल्ह्यासह सोलापूर, सातारा जिल्ह्यातील इच्छुकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सांगोला येथील दोन, सातारा येथील एक व मुंबईच्या एकाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वत्र चर्चा सुरु होती.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती उमेदवार रिंंगणात राहणार, हे कळणार आहे. त्यानंतरच तासगाव-कवठेमहांकाळचे पोटनिवडणुकीतील रणांगण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अर्ज माघारीकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

मोहनराव कदम यांचेही ‘बिनविरोध’साठी आवाहन
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, त्यांनी अर्ज मागे घ्यावेत. आर. आर. पाटील यांचे महाराष्ट्राच्या विकासात आणि आदर्शवत वाटचालीत बहुमोल योगदान आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुमनताई यांना बिनविरोध निवडून द्यावे, जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील ज्या उमेदवारांनी अर्ज भरले असतील, त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन ज्येष्ठ नेते व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी केले. काँग्रेस पक्ष उमेदवार देणार नाही, ही आम्ही भूमिका घेतलीच, शिवाय सुमनताई यांची बिनविरोध निवड व्हावी, हीच आमची इच्छा आहे.


आता ‘बिनविरोध’साठी कसरत
‘तासगाव-कवठेमहांकाळ’च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ही निवडणूक बहुचर्चित ठरली आहे. सुमनतार्इंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ‘निवडणूक की बिनविरोध’ हा विषय गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात चर्चेचा ठरला. राष्ट्रवादीने केलेल्या आवाहनानुसार सर्वच पक्षांनी सुमनतार्इंना पाठिंबा देत उमेदवार दिलेला नाही. तरीही अपक्षांची गर्दी वाढल्याने ‘बिनविरोध’साठी नेतेमंडळींना तारेवरची करावी लागणार आहे.