Sangli: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची कार मणेराजुरीत पेटविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 15:49 IST2024-10-22T15:49:42+5:302024-10-22T15:49:42+5:30

मणेराजूरी : मणेराजुरी (ता. तासगाव) राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चारचाकी कार पेटविण्यात आली. घराचे आतील छतही पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे. या ...

Nationalist Sharad Chandra Pawar group office bearer car set on fire in Manerajuri Sangli | Sangli: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची कार मणेराजुरीत पेटविली

Sangli: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची कार मणेराजुरीत पेटविली

मणेराजूरी : मणेराजुरी (ता. तासगाव) राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चारचाकी कार पेटविण्यात आली. घराचे आतील छतही पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकाराने तासगाव तालुक्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार पूर्ववैमन्यासूतन झाला की राजकीय वादातून याचा तपास तासगाव पोलिस करीत आहेत. या आकस्मिक घटनेची तासगाव पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) गटाचे युवा नेते व तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रामचंद्र पवार यांचे राजमाने वस्ती रस्त्यावर घर आहे. पवार यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्या बांधकामाशेजारीच शेडमध्ये रविवारी दुपारी लावलेली चारचाकी कार(एमएच१०/बीक्यू ३७७७) वर अज्ञातांनी रविवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान पेटविली. 

ज्वालाग्राही स्प्रे मारून चारचाकी पेटविल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. याच ठिकाणी नवीन घराचे बांधकामाचे आतील सिलिंगही पेटल्याचे दिसत आहे. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची अज्ञातांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यामध्ये रामचंद्र पवार यांनी तक्रार केली आहे. या घटनेला राजकीय संबंध आहे का ? का अन्य कोणता ? याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Nationalist Sharad Chandra Pawar group office bearer car set on fire in Manerajuri Sangli