शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या दुबळेपणामुळे राष्ट्रवादीची शिरजोरी

By admin | Updated: August 6, 2015 22:59 IST

वाळवा-शिराळ्यातील चित्र : भाजप, शिवसेना, शेतकरी संघटनांचे पक्षीय नेते अस्वस्थ

अशोक पाटील- इस्लामपूरआमदार जयंत पाटील जिल्ह्यावरील पकड मजबूत करू लागले आहेत, परंतु केंद्रात व राज्यात त्यांची सत्ता नाही. शिराळ्याचे आमदार भाजपची सत्ता असूनही मंत्रीपद मिळविण्यासाठी कोअर कमिटीच्या दारात उभे आहेत. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन बसले, त्यामुळे ज्येष्ठ असूनही त्यांना जयंत पाटील यांचे नेतृत्व मानावे लागत आहे. काँग्रेसचे सत्यजित देशमुख राष्ट्रवादीची कास धरून आहेत. नानासाहेब महाडिक यांना पक्ष नाही. शिवसेनेला नेता नाही. मनसेची तर वाताहतच झाली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे हे सर्वच नेते सध्या अस्वस्थ आहेत.जयंत पाटील जिल्ह्यावरील पकड मजबूत करण्यासाठी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदाचा फायदा उठवण्याचा डाव खेळत आहेत. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ माजी मंत्री पतंगराव कदम यांनी ढासळलेल्या काँग्रेसला पुन्हा ऊर्जा देण्यासाठी जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. त्यामुळे पाटीलही अस्वस्थ झाले आहेत. अण्णासाहेब डांगे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार पवार यांच्या गोटात जाऊन बसले आहेत. परंतु स्थानिक पातळीवर जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून काम करावे लागत आहे. राष्ट्रवादीने त्यांना पंढरपूर देवस्थानचे अध्यक्षपद आणि त्यांचे चिरंजीव अ‍ॅड. चिमण डांगे यांना नगराध्यक्षपद यापलीकडे काहीही दिलेले नाही. अशीच अवस्था माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची झाली आहे. ते जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात, परंतु काँग्रेसच्या सत्यजित देशमुख यांना सोबतीला घेतल्याशिवाय आमदार शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात ते काहीही करू शकत नाहीत. जनतेने शिवाजीराव नाईक यांना विजयी केले असले तरी, नाईक भाजपकडील मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत अस्वस्थ होऊन मुंबईच्या वाऱ्या करत आहेत.वाळवा-शिराळ्यातील साखरसम्राटांचा सहकारी संस्थांवर दबदबा आहे. या दोन तालुक्यातील रोजगाऱ्यांच्या हाताला काम, ऊस उत्पादकांना दर देण्यासाठी प्रामुख्याने जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, वैभव नायकवडी यांनी प्रयत्न केले आहेत, तर अण्णासाहेब डांगे यांनी सूतगिरणी, शिक्षक क्षेत्रात पाया मजबूत केला आहे. शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख सहकारी क्षेत्रात बॅकफूटवर आहेत. ऊस उत्पादकांच्या ताकदीवर खासदार राजू शेट्टी यांनी भाजपचा सोगा धरून काहीतरी पदरात पाडून घेण्याचा डाव आखला आहे. परंतु हे करताना स्वत:च्या लोकप्रियतेची ताकद कमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आलेले नाही. सदाभाऊ खोत मंत्री झाले, तर खोत यांची ताकद वाढेल म्हणून संघटनेतील नेतेच त्यांचे अडसर बनले आहेत. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांचे राजू शेट्टी शिष्य आहेत. पाटील यांच्यावर चिखलफेक करीत आपणच शेतकऱ्यांचे सच्चे नेते आहोत, असा दिखावा ते करत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेतील कार्यकर्त्यांची वाताहत होत चालली आहे.पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांच्यासाठी आमदारकी मृगजळ ठरले आहे. जिल्ह्यातील नेते स्वत:च्या स्वार्थासाठी ‘नाना’ यांच्या ताकदीचा वापर करीत आहेत. त्यामुळे नाना म्हणतील तो पक्ष असे समीकरण झाले आहे. पेठनाक्यावरील साम, दाम, दंडाची परंपरा बंद करून त्यांचे चिरंजीव राहुल महाडिक शिक्षण क्षेत्रात जम बसवून राजकारणात ठसा उमटविण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरे चिरंजीव जि. प. सदस्य सम्राट यांनी वाळवा-शिराळ्यात युवकांना एकत्र करून विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.भाजप, शिवसेना, मनसेची अवस्था नायक नसलेली झाली आहे. शिवाजीराव नाईक भाजपचे आमदार आहेत. त्यांना केवळ त्यांचेच कार्यकर्ते मानतात. पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते त्यांचे नेतृत्व मानत नाहीत. काँग्रेसच्या दुफळीचा राष्ट्रवादीला फायदाकाँग्रेसची ताकद राष्ट्रवादीला शह देण्यासाठी पुरेशी असली तरी, त्यांच्यात एकी नसल्याने दुही माजली आहे. याचा फायदा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील उठवत आहेत.भाजपमध्येही दुफळी आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, नगरसेवक आनंदराव पवार हे पक्ष डोक्याने न चालवता मनगटावर चालवतात. त्यामुळे शिवसेनेची हवा त्यांच्याभोवतीच फिरत आहे.शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांचे राजू शेट्टी शिष्य आहेत. पाटील यांच्यावर चिखलफेक करीत आपणच शेतकऱ्यांचे सच्चे नेते आहोत, असा दिखावा ते करत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेतील कार्यकर्त्यांची वाताहत होत चालली आहे.