शहरं
Join us  
Trending Stories
1
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
4
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
7
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
8
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
9
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
10
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
11
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
12
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
13
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
15
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
16
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
17
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
20
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका गोत्यात

By admin | Updated: May 14, 2015 23:53 IST

कारवाईलाही ‘अभय’ : एलबीटीप्रश्नी थकबाकीदार व्यापाऱ्यांवर कृपादृष्टी

सांगली : दंड व व्याज माफीसाठी शासनाने जाहीर केलेल्या अभय योजनेंतर्गत आता लाभार्थी होणाऱ्या थकबाकीदार व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही. शासनाच्या आदेशातच तसा उल्लेख असल्याने, राज्यातील सर्वच महापालिकांचे प्रशासन अडचणीत सापडले आहे. दंड व व्याजाबरोबरच संभाव्य कारवाईपासूनही व्यापाऱ्यांची मुक्तता झाली असून, महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. सांगलीत एलबीटीविरोधी कृती समितीने केलेल्या बहिष्कार आंदोलनामुळे महापालिका दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडली आहे. महापालिकेचा डोलारा कोसळला असतानाच, दंड व व्याजमाफीच्या शासननिर्णयामुळे ६० कोटी रुपयांवर प्रशासनाला पाणी सोडावे लागणार आहे. त्यातच थकबाकीदार व्यापारी व विवरणपत्र न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी तयारी सुरू असतानाच, शासनाने अभय योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अडचणीत भरच पडली आहे. शासनाच्या या सूचनेनुसार ३१ जुलैपर्यंत व्यापाऱ्यांना विवरणपत्र व कर भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मुदतीत जे व्यापारी पूर्ण कर भरतील, त्यांचा दंड व व्याज माफ होणार आहे. तोपर्यंत महापालिकेला अशा कोणत्याही थकबाकीदार व्यापाऱ्यावर कारवाई करता येणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांवर दाखविलेल्या कृपादृष्टीमुळे महापालिकेच्या अडचणीत भरच पडली आहे. व्यापाऱ्यांनी स्वत:हून कर भरण्याची अपेक्षा करण्याशिवाय महापालिकेच्या हाती आता काहीही उरलेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यास नकार देत असहकार आंदोलन पुकारले होते. गत महिन्यात व्यापारी आणि महापालिकेत तडजोड होऊन कर भरण्यास व्यापारी तयार झाले. तरीही तडजोडीप्रमाणे व्यापाऱ्यांकडून एलबीटी भरण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. व्यापाऱ्यांकडे १७० कोटींची एलबीटी थकीत असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. जकातीची शेवटची वसुली १०५ कोटी रुपये होती. त्यात दोन वर्षांची नैसर्गिक वाढ गृहीत धरून ती रक्कम १४५ कोटींच्या घरात जाते. यातील किमान १२० कोटी रुपये तरी महापालिकेच्या तिजोरीत जमा व्हावेत, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. मार्च २०१५ पासून ३१ जुलै २०१५ पर्यंतचाही एलबीटी गृहीत धरता, महापालिकेला १५० कोटी रुपये अपेक्षित होते. (प्रतिनिधी)मुदतीनंतर कारवाई?शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अभय योजना ३१ जुलैपर्यंतच लागू आहे. त्यानंतर जे व्यापारी चालू किंवा थकीत कर भरतील, त्यांना दंड व व्याज लागू होणार आहे. त्यामुळे ही मुदत संपण्याची प्रतीक्षा महापालिकेला करावी लागणार आहे. जुलैपर्यंत हरित न्यायालयाच्या आदेशानुसार घनकचरा प्रकल्पासाठी महापालिकेस ४० कोटी भरावे लागणार असल्याने महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. हरकती व सूचना शासनाच्या अभय योजनेबाबतची प्रसिद्धी येत्या दोन दिवसांत करण्यात येणार असून त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. २० दिवसांत या सूचना नागरिकांनी शासनाकडे दाखल करायच्या आहेत.