शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत लवकरच बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST

शिंदे म्हणाले की, शिक्षक नेते संभाजीराव थोरात व प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांची भेट ...

शिंदे म्हणाले की, शिक्षक नेते संभाजीराव थोरात व प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन वाढवून ३० व ४० हजार करावे. प्राथमिक शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश द्यावा. २० पटापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत. अंशदान पेन्शन योजना लागू असलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्यावर वारसाला विनाअट दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे. शिक्षकांना वैद्यकीय उपचार इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कॅशलेश सुविधा देण्यात यावी. वस्ती शाळेत नेमणूक दिलेल्या शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी मूळ नेमणूक दिनांक ग्राह्य धरावा. प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांच्या उच्चशिक्षणासाठी फी माफीस आर्थिक तरतूद करावी. उच्च प्राथमिक शाळेला विनाअट मुख्याध्यापक व सेवक पदाला मान्यता द्यावी, जिल्हा परिषद केंद्रीय शाळेसाठी संगणक ऑपरेटर किवा लिपिकाचे पद मान्य करावे. केंद्रप्रमुखांची रिक्‍त ८० टक्‍के पदे पदवीधर शिक्षकांतून पदोन्नतीने भरावीत. शिक्षकांना बीएलओसह इतर अशैक्षणिक कामातून मुक्‍त करावे. जिल्हा षरिषद शाळेतील वीज देयके जिल्हा परिषद फंडातून भरावीत, आदींसह विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी पुढील आठवड्यात सचिव स्तरावर बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.