शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

चार महिने विवाह मुहूर्त नसल्याने मंगल कार्यालये ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : एकीकडे लग्नसमारंभासाठी निर्बंध शिथिल झाले असले तरी, पुढचे चार महिने विवाह मुहूर्तच नसल्याने मंगल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : एकीकडे लग्नसमारंभासाठी निर्बंध शिथिल झाले असले तरी, पुढचे चार महिने विवाह मुहूर्तच नसल्याने मंगल कार्यालये ओस पडली आहेत. व्यावसायिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

लग्नसमारंभासाठी २०० लोकांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात मात्र या काळात लग्नाचे मुहूर्तच नसल्याने मंगल कार्यालये ओस पडली आहेत. ऑगस्टमध्ये लग्न समारंभाचे मुहूर्त नाहीत. मात्र २६, २७, ३० आणि ३१ यासोबतच सप्टेंबर महिन्यातील १,८, १६ व १७ या तारखेचे गौण मुहूर्त आहेत. पुढचे चार महिने लग्नासाठी मुहूर्त नसल्याने अनेक जणांनी लग्न लांबणीवर टाकले आहे. लग्न समारंभ बंद असल्याने यावर चालणारे अनेक व्यवसाय डबघाईला आले आहेत. केटरर्स व्यवसाय तर फक्त नावाला उरला आहे. गेल्यावर्षीपासून मोठ्या ऑर्डर मिळत नसल्याने अनेक कामगार कामावरून काढावे लागले आहेत. मोठ्या समारंभासाठी लागणारी साधनसामग्री धूळ खात पडून आहे.

चौकट

पहिले पाढे पंचावन्न

कोरोनाचे रुग्ण जास्त होते आणि म्हणून निर्बंध असल्याने लग्नसमारंभ मोजक्या लोकांत उरकावा लागायचा. आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आलीच तर पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’, अशी स्थिती होईल, अशी भीती व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.