Sangli: व्यसनाधीन पतीचा त्रास; महिलेने तीन चिमुरड्यांसह नदीत उडी घेऊन संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:49 IST2025-03-07T17:49:16+5:302025-03-07T17:49:38+5:30
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित पतीस ताब्यात घेतले

Sangli: व्यसनाधीन पतीचा त्रास; महिलेने तीन चिमुरड्यांसह नदीत उडी घेऊन संपवले जीवन
शिरगुपी : व्यसनाधीन पतीचा त्रास व कौटुंबिक वादातून विवाहितेने आपल्या तीन मुलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रायबाग तालुक्यातील चिंचली येथे घडली. बुधवारी ही घटना उघडकीस आली. कुडची पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित पतीस ताब्यात घेतले.
शारदा ढाले (वय ३८) असे महिलेचे नाव आहे. तिने अनुषा ढाले (वय १०) अमृता ढाले (वय १४) व आदर्श ढाले (वय ८) या चिमुकल्यांसह आत्महत्या केली. ढाले कुटुंब मायाक्का चिंचली येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिंचली येथील रहिवासी असलेल्या अशोक ढाले व शारदा ढाले यांचे १८ वर्षापूर्वी लग्न झाले होते. अशोक हा दररोज दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करून कौटुंबिक व मानसिक त्रास देत होता. अशोक ढाले याच्या त्रासाला पत्नी कंटाळली होती. त्यामुळे तिने तीन मुलासह आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे.
आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर कुडची पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अशोक ढाले (वय ४५) याला पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, चौघांचे मृतदेह नदीच्या पात्राबाहेर काढल्यानंतर शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक प्रीतम नायक करत आहेत.